मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! सोशल मीडियावर सुरू होती चाइल्ड पॉर्नची विक्री; CBI ने दोघांना केली अटक

धक्कादायक! सोशल मीडियावर सुरू होती चाइल्ड पॉर्नची विक्री; CBI ने दोघांना केली अटक

एक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा घृणास्पद प्रकार सुरू होता.

एक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा घृणास्पद प्रकार सुरू होता.

एक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा घृणास्पद प्रकार सुरू होता.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 10 जानेवारी : दिल्लीत दोघांना चाइल्ड पॉर्नोग्राफीची (Child Pornography) खरेदी, विक्री आणि सर्क्युलेशनच्या (प्रसार) आरोपात अटक करण्यात आली आहे. या लोकांवर ई-कॉमर्स अॅप्लिकेशनच्या माध्यमातून चाइल्ड पॉर्नोग्राफीची खरेदी आणि विक्री करणे आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रसार करण्याचा आरोप आहे. सीबीआयने दोघांना अटक केल्यानंतर सांगितलं की, आरोपी नीरज कुमार यादव आणि कुलजीत सिंह माकन 2019 पासून एक मोठ्या नेटवर्कला चाइल्ड पॉर्नोग्राफीची विक्री, खरेदी आणि एडव्हरटाइजिंग करीत होते.

सीबीआयने सांगितलं की, आरोपींनी कथित स्वरुपात एका तिसऱ्या व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात सॅक्शुअल डेटा खरेदी केला, ज्यात अल्पवयीन मुलं होती. त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएमच्या माध्यमातून पैसे पाठवले आणि हे साहित्य क्लाउड बेस्ड वेबसाइटवर स्टोअर करुन ठेवले. आरोपीने कथित स्वरुपात इंस्टाग्रामवर हा अश्लील कंटेन्टची जाहीरात केली आणि याच्या विक्रीसाठी प्रयत्न केले.

हे ही वाचा-कौतुकास्पद निर्णय! विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी परिवहन विभागाने बदलली बसची वेळ..

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने सांगितलं की, यादव आणि माकन पेटीएम आणि गूगल प्लेच्या माध्यमातून पैसे घेतल्यानंतर व्हॉट्सएप, टेलीग्राम, इंस्टग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अश्लील साहित्य शेअर करीत होते. ही अटक सोशल मीडिया प्लेटफॉर्मवरील चाइल्ड पॉर्नशी संबंधित विक्रीबाबत सीबीआयच्या तपासातील एक भाग आहे. नीरज कुमार यादव आणि कुलजीत सिंह माकन याच्याविरोधात आयटी अॅक्ट आणि POCSO अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन अटकेत पाठविण्यात आलं आहे.

First published:

Tags: Crime news, Delhi, Porn video