Home /News /crime /

Shocking! घराबाहेर पडला होता पत्नीचं शिर कापलेला मृतदेह; ते दृश्य पाहून नागरिक हादरले!

Shocking! घराबाहेर पडला होता पत्नीचं शिर कापलेला मृतदेह; ते दृश्य पाहून नागरिक हादरले!

हा प्रकार पाहून कोणालाही धक्का बसेल.

    केरळ, 22 डिसेंबर : पती-पत्नी (Husband and Wife) लग्नात सप्तपदी घेताना आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. चांगल्या-वाईट सर्व परिस्थितीत एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली जाते. मात्र जेव्हा या दोघांमधील नात्यात जेव्हा कटूूता येते तेव्हा मात्र हे पती-पत्नी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. केरळमध्ये (Keral Crime News) अशीच एक घटना समोर आली आहे. हा प्रकार पाहून कोणालाही धक्का बसेल. ही घटना केरळमधील कन्नूर येथे घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत असंही काही केलं, गावभर खळबळ उडाली. कन्नूरमधील पेरिंगाथुरमध्ये एका दाम्पत्यामध्ये वाद झाला. यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नीचा गळाच कापला. ही घटना मंगळवारी रात्री 11.45 वाजता घडली. रात्री आरडाओरडा ऐकून शेजारीही जागे झाले. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर तिचा गळा कापलेला होता. सर्वत्र रक्त पसरलेलं होतं. वेदनेने विव्हळत असणारी महिला स्वत:ला वाचवण्यासाठी मदतीची मागणी करीत होती. मात्र जखम इतकी जास्त होती की, तिचं वाचणं अशक्य होतं. हे ही वाचा-लग्नाच्या 24 व्या दिवशी सासरी आलेल्या जावयाची हत्या; दार उघडताच घातल्या गोळ्या रक्ताच्या थाऱोळ्यातून उचलून शेजारच्यांनी महिलेला रुग्णालात नेलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. यावेळी आरोपी पतीदेखील हजर होता. यानंतर आरोपीसह ज्या शस्त्राने हत्या केली तेदेखील ताब्यात घेण्यात आलं. पोलीस आले तर पती तेथून पळाला नाही. पत्नीची हत्या केल्यानंतर पती आत्महत्या करणार असल्याचं समोर आलं आहे. तो स्वत:ला मारण्याचा प्लान करीत होता. त्याने पोलिसांसमोर याची कबुलीही दिली. तो आपल्या जीवनाला कंटाळला होता, त्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. हे कृत्य केलं तेव्हा त्याचा मुलगा कामावर गेला होता तर धमुष्या ही सासरी होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala, Murder

    पुढील बातम्या