• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लग्नाच्या 7 दिवसात नवविवाहितेने उचललं धक्कादायक पाऊल; मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून आई हादरली

लग्नाच्या 7 दिवसात नवविवाहितेने उचललं धक्कादायक पाऊल; मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून आई हादरली

लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य आनंद होतं, पण...

 • Share this:
  बेतिया, 20 डिसेंबर :  लग्नाच्या अवघ्या 8 दिवसात नवरीने आपल्या पतीची अत्यंत क्रुरपणे (Brutal Murder) हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येची ही घटना बेतिया गावातील आहे. येथे एका नवविवाहित जोडप्याचा संसार सुरू होण्यापूर्वीच संपला. या नवविवाहितेने पतीच्या गळ्यावर वार करीत त्याची हत्या केली. लग्नाच्या (Marriage) अवघ्या आठ दिवसात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या आरोपी नवविवाहितेला ताब्यात घेण्यात आले आहे व तिची चौकशी सुरू आहे. ही घटना बेतिया पोलीस हद्दीतील आहे. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वधुने असं पाऊल का उचललं? पोलिसही तिला वारंवार हाच प्रश्न विचारल आहेत, मात्र ती काहीही उत्तर देण्यात तयार नाही. पोलिसांना हत्येत कोणतंही शस्त्रही सापडलं नाही. याबाबतची पोलीस तिची चौकशी करीत आहे. सांगितलं जात आहे की, गावात मजुरी करणारे श्याम साह याचं गेल्या रविवारी 13 डिसेंबर रोजी विवाह संपन्न झाला होता. श्याम याचं लग्न चंपारण येथील गोविंदगंज पोलीस हद्दीतील सरेया गावात झालं. यानंतर नवं जोडपं आनंदाने आपल्या घरात राहत होतं. मात्र रविवारी सकाळी जेव्हा श्यामची आई त्याला उठवायला गेली, तेव्हा तो रक्ताळलेल्या अवस्थेत खोलीत पडलेला होता. सासूने हे पाहिल्याचे लक्षात येताच श्यामची पत्नी घरातून पळ काढायचा प्रयत्न करू लागली, तेव्हा कुटुंबीय व गावकऱ्यांनी तिला पकडलं. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला. श्यामच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस तिची चौकशी करीत आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनाही याबाबत सूचना देण्यात आली आहे. लग्नाच्या आठ दिवसात असं काय घडलं की नवविवाहितेने असं पाऊल उचललं. सध्या मुलीची चौकशी सुरू आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: