नवी दिल्ली, 25 जानेवारी : कधी कधी एखादी लहानशीही चूकही भारी पडू शकते. अशीच एक घटना दिल्लीत पाहायला मिळत आहे. येथे दोन मित्र इमारतीच्या गच्चीवर जाऊन थट्टा-मस्करी करीत होते. अशातच ते छतावर खाली पडले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण
ही घटना गीता कॉलनीतील आहे. येथे फॅक्टरीत काम करणारे दोन मित्र फॅक्टरीच्या गच्चीवर जेवायला गेले होते. यादरम्यान ते एकमेकांसोबत थट्टा-मस्करी करीत होते. यादरम्यान ते एकमेकांना गुदगुल्या करू लागला. त्यातच दोघेही गच्चीवरुन खाली पडले. खाली एका गल्लीत पडल्यानंतर जागेवरच दोघांचा मृत्यू झाला. सांगितलं जात आहे की, गच्चीवर चारही बाजूला सुरक्षित कुंपन नव्हतं. या दोघांचं नाव शफीक आणि शकील असल्याचं समोर आलं आहे.
हे ही वाचा-63 वर्षांचे आजोबा शोधतायेत 7 वी बायको; सहावीने Sex करण्यास नकार दिला म्हणून...
दोघेही चांगले मित्र होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शफीक कुटुंबासोबत जाफराबाद भागात राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि अन्य सदस्य आहेत. तर शकीलही त्याच्या घराशेजारी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती.
प्रकरणाचा तपास सुरू
शफीक आणि शकील दोघेही मुकेश दुआ नावाच्या व्यापाऱ्याच्या फॅक्टरीत काम करीत होते. या फॅक्टरीत रेडीमेंड गारमेंटरचं काम केलं जातं. फॅक्टरीच्या गच्चीवर केवळ पायऱ्यांजवळ दरवाजा लावण्यात आला आहे. गच्चीवर चारही बाजूला भिंत नाही. आज दोघे मित्र थट्टा-मस्करी करीत गच्चीवर गेले. यादरम्यान ते सज्जेजवळ आले आणि नियंत्रण गेल्यानंतर दोघेही खाली पडले. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.