मुंबई, 19 मे : मुंबईच्या जवळील अलिबागमधून
(Alibaug News) एक हैराण करणारी घटना समोर आली होती. येथील एका लॉजच्या खोलीतील बेडवर 4 जणांचा मृतदेह पडला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. सुरुवातीच्या तपासात कुटुंबाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र तपासानंतर भयंकर बाब समोर आली आहे.
6 दिवसांपासून हॉटेलमध्ये राहत होते चौघं..
रायगडच्या ब्लॉसम कॉटेजच्या समोर ही घटना घडली आहे. प्राथमिक
तपासात हे चौघे मूळत: पुण्यातील शिक्रापूर येथील राहणारे होते. गेल्या काही दिवसांपासून ते बाहेर फिरायला गेले होते. चौघेही 11 मे पासून ब्लॉसम कॉटेजमध्ये राहत होते. 17 मे रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची सूचना मिळाली. मृत व्यक्तींमध्ये कुणाल चिंतामन गायकवाड (29), प्रियंका संदीप इंगले (25) आणि महिलेची दोन मुलं भक्ती संदीप इंगले (5) आणि मौली संदीप इंगले (3) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
महिला आपल्या दोन मुलांना घेऊन एका अन्य तरुणासह घराच्या बाहेर न सांगता गेली होती. प्रियंका घरातून गायब झाल्यानंतर तिचा पती संदीप इंगळेने (34) शिक्रापूर पोलीस ठाण्यात 11 मे रोजी तक्रार दाखल केली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे महिला घर सोडून गेली, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. आता पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे महिलाने मुलांना घेऊन मरण पत्करलं. सध्या पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. मात्र खोलीची स्थिती पाहून पोलीस याला आत्महत्या आणि हत्या अशा दोन्ही पैलूने तपास करीत आहेत.
हॉटेलच्या मालकाने सांगितला घडलेला प्रकार..
पोलीस इन्स्पेक्टर हेमंत शेगे यांनी सांगितलं की, कॉटेजचे मालक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. कॉटेज मालकाने सांगितलं की, मंगळवारी सकाळी जेव्हा खोलीतून आवाज आला नाही तर काहीतरी घडल्याचा संशय आला. आम्ही दार ठोठावलं. मात्र आतून कोणीही दार उघडलं नाही. दुसऱ्या किल्लीने मालकाने दार उघडलं. आणि खोलीची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला. चौघांचे मृतदेह खोलीत पडले होते. आणि महिला पुरुषांचे मृतदेह सीलिंगला लटकले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.