Home /News /crime /

धक्कादायक! फिल्ममेकिंगच्या आडून देह विक्रय रॅकेट; निर्माता असा करायचा तरुणींचा सप्लाय

धक्कादायक! फिल्ममेकिंगच्या आडून देह विक्रय रॅकेट; निर्माता असा करायचा तरुणींचा सप्लाय

या निर्मात्याने 7 वर्षांमध्ये तरुणींची यादी तयार केली होती. या यादीचा उपयोग तो देह विक्रय व्यवसायासाठी करीत होता.

    नवी दिल्ली, 16 जुलै : प्रॉडक्शन कंपनीच्या आडून देह विक्रय व्यवसाय (Prostitution business under film production company) चालविणाऱ्या हॉलिवूडच्या एका दिग्गज चित्रपट निर्मात्याला अटक करण्यात आली आहे.  निर्माता डिल्लन जॉर्डन (Dillon Jordan) याला कॅलिफोर्मियामधील सॅन बर्नंडियो या देशातून अटक करण्यात आली आहे. डेडलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, हॉलिवूड चित्रपट निर्मात्याने 2010 ते 2017 मे पर्यंत महिलांची यादी केली होती. या महिला अमेरिकेत राहतात आणि पैशांच्या बदल्यात जॉर्डनमधील ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवतात. जॉर्डनचा (Dillon Jordan)  लंडनमधील एका महिलेसोबतही संपर्क झाला होता. या महिलसोबत निर्माता संपर्कात होता आणि तिच्यासोबत ग्राहक, देह विक्रय महिलांची माहिती शेअर करीत होता. कोर्टाने अद्याप महिलेचं नाव उघड केलेलं नाही. मिळालेल्या माहितीमुसार, निर्माता जॉर्डन स्वत: या महिलांच्या प्रवासाची जबाबदारी घेत असे. किंवा ग्राहकांकडूनच महिलांच्या आंतरराज्यातील प्रवासाची सोय करण्यास सांगत असे. हे ही वाचा-Shocking! घामापासून सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन केलं, फिटनेस मॉडेलने गमावला जीव देह विक्रयसाठी घेतली जाणारी रक्कम तो मॉडलिंग, अपीयरेन्स, कन्सल्टिंग, मसाज थॅरपी वा हाउस पार्टीसाठी घेतल्याचं दाखवित होता. एका प्रेस रिलीजमध्ये यूएस अटॅर्नी Attorney Audrey Strauss यांनी सांगितलं की, आपल्या 2 मोठ्या कंपन्यांच्या आडून डिल्लन जॉर्डन (Dillon Jordan) अनेक वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात देह विक्रय रॅकेट चालवित होता. लोकांना दाखविण्यासाठी तो फिल्म प्रॉडक्शन कंपनी, इवेंट प्लानिंग आणि पार्टी प्लानिंग कंपनी चालवीत होता. कोर्टाने दिले निर्देश अॅटर्नी (Dillon Jordan) यांनी सांगितलं की, आता प्रकरण उघड झालं आहे. सध्या डिल्लन याला जामीनावर सोडण्यात आलं आहे. मात्र त्याने या प्रकरणातील कोणताही साक्षीदार, पीडितेसोबत संपर्क न करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्याच्याजवळ काही शस्त्र असल्यास त्याने तो कोर्टात जमा करावे असंही कोर्टाने यावेळी सांगितलं.    
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Film

    पुढील बातम्या