धक्कादायक प्रकार! खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली

धक्कादायक प्रकार! खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने हॉटेल मालकाची बोटेचं छाटली

यामध्ये हॉटेल मालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • Share this:

फरीदाबाद, 24 सप्टेंबर: हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खंडणी दिली नाही म्हणून सेक्टर 2 मधील एका ढाब्याच्या मालकाला काही लोकांनी तलवार आणि रॉर्डने मारहाण केली. यामध्ये ढाबा मालक गंभीर जखमी झाली आहे.

सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. काही तरुण ढाबा मालकाकडे खंडणी मागू लागले. मात्र ढाबा मालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर या तरुणांनी मालकावर हल्ला केला. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू झाला आहे.

चंदावली गावातील निवासी त्रिलोक यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ते भाऊ अनिल यादवसह सेक्टर-2 मध्ये ढाबा चालवितात. रात्री साधारण 10 वाजता ढाबा बंद करीत असताना काही तरुण स्कॉर्पिओ व स्विफ्ट गाडीतून आले. या गाडीत मनोज भाटी, अनिल आणि त्याच्या मोठ्या भावासह 8 ते 10 तरुण होते. पीडित्याने आरोप केला आहे की, मनोज भाटीच्या हातात तलवार होती. तर अनिलसह त्याचा भाऊ यांच्या हातात रॉड होती. इतर मुलांकड़े काठ्या होत्या. पीडित व्यक्तीने आरोप केला आहे की, मनोज भाटी येताच त्रिलोकला शिव्या देत तलवारीने वार केलं. त्रिलोकने बचाव करण्यासाठी डोक्यावर हात ठेवला होता, तर तलवारीने त्याच्या डोक्यावर वार करीत अंगठा व बोटंच कापली. अनिलच्या हातावर रॉडने जोरदार वार करण्यात आला. यामुळे त्याचा हात तुटला.

हे ही वाचा-शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना

पीडित्याने आरोप केला आहे की, अनिलाच्या भावाशिवाय अन्य 8 ते 10 तरुणांनी त्याला डोक्यावर व अन्य ठिकाणी मारहाण केली. त्यात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. मनोज भाटीन ढाबा मालकाला धमकी दिल्याचा दावा पीडित्याने केला आहे. ढाबा चालवायचा असेल तर प्रत्येक महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी धमकी त्याने ढाबा मालकाला दिली आहे. एसएचओ सुदीप सिंह यांनी सांगितले की , या प्रकरणात आरोपींविरोधात केस दाखल करण्यात आला असून त्यांचा तपास सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 24, 2020, 10:09 AM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading