गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ, 25 ऑगस्ट : सासू सुनेचं भांडण दैनंदिन रोजच कानावर पडत असतं मात्र रोजच्या भांडणाला कंटाळून चक्क सासूचाच काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार शिक्षणाच्या माहेर घरात उघडकीस आलाय. 14 जुलै रोजी पुण्यातील येरवडा (Yerwada Pune) परिसरात 70 वर्षीय वृद्ध महिला हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती, परंतु घटनेच्या जवळपास एक महिन्याच्या अंतरानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरवलेल्या महिलेची हत्या (Murder) झाल्याचं समोर आलंय. या हत्येत खुद्द तिच्याच सुनेचा हात असल्याचं स्पष्ट झाले आहे.
येरवडा येथील सोजराबाई जोगदंड ही महिला मिसिंगची तक्रार (Missing Complaint) 14 जुलै रोजी दाखल करण्यात आली. पुणे पोलिसांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात सविस्तर वृत्त पाठविले मात्र एकमहिन्या नंतर पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयातील युनिट दोनच्या पथकातील कर्मचारी यांना खबरी मार्फत माहीती मिळाली. या माहितीनुसार, एका महिलेच्या हत्येत सहभागी असलेला आरोपी हा निगडी ओटा स्कीम येथे मुक्त संचार करतोय. तात्काळ पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले आणि पोलीसी खाक्या दाखवताच झाला एका खुनाचा उलगडा.
...म्हणून प्रेयसीचं हात-पाय अन् मुंडकं केलं धडावेगळं; पुण्याला हादरवणारी घटना
आरोपी इम्तियाज शेख याने त्याची मावशी मुन्नी जोगदंड हिच्या मदतीने मावशीच्या सासूची हत्या केल्याची माहिती उघड केली. पोलीस तपासात आरोपी इम्तियाज याच्यावर हत्येचे दोन गुन्हे देखील दाखल असून सध्या तो येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपींनी सोजराबाई जोगदंड यांची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह मावळातील देहूरोड परिसरात एका पुलाजवळ झुडपात टाकून दिला.
खून पुण्यात आणि मृतदेह मावळात
आरोपीने हत्या करून टाकलेला मृतदेह पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला असून हत्येतील आरोपी शेखच्या युनिट दोनच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर या खून प्रकरणातील आरोपी सून मुन्नी जोगदंड ही सध्या फरार असून पोलीस तिच्या मागावर असून लवकरच तिला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.
सासू सुनेचे घरघुती वाद सुरूच असतात, मात्र हे इतके विकोपाला जातील याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळे एका वृद्ध सासूला सासूरवास करते म्हणून आपला नाहक जीव गमवावा लागला. भांड्याला भांड लागत असतं परंतु सुनेने ही इतक्या टोकाची भूमिका घेऊन स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून घेतली. या घटनेनंतर संसारी महिलांनी बोध घेण्याची वेळ आलीये, शांत सुंदर परिवार हाच उत्तम पर्याय जगण्याचा असल्यास प्रत्येक माणसाचं आयुष्य आनंदी होईल यात काहीच शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.