मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नवरा, बायको, दीर! तिघांचा वाद 3 मुलांच्या जीवावर आईनं चहातून विष दिलं आणि....

नवरा, बायको, दीर! तिघांचा वाद 3 मुलांच्या जीवावर आईनं चहातून विष दिलं आणि....

नवरा-बायकोमधील भांडणाचा राग मुलांवर निघाला आणि होत्याचं नव्हतं झालं. हे जेव्हा नवऱ्याला कळलं तेव्हा तो कोसळला. रक्षाबंधनासाठी पत्नी आपल्या मुलांना माहेरी घेऊन गेली. तिथे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.

  गाजीपूर : नवरा-बायकोमधील भांडणाचा राग मुलांवर निघाला आणि होत्याचं नव्हतं झालं. हे जेव्हा नवऱ्याला कळलं तेव्हा तो कोसळला. रक्षाबंधनासाठी पत्नी आपल्या मुलांना माहेरी घेऊन गेली. तिथे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनीता देवी आपल्या तीन मुलांना घेऊन रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. दोन दिवसांआधी तीचं आणि नवरा आणि दिरासोबत फोनवरून भांडण झालं होतं. त्यामुळे सुनीता देवी नाराज होती. त्याचा राग तिने मुलांवर काढला. त्यांना चहामधून विष दिलं. ती एवढी नाराज होती की तिने मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट चहामधून विष दिलं. चहामधून पोटात विष गेल्यानं तीन मुलांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर होती. हा सगळा प्रकार जेव्हा नवऱ्याला समजला तेव्हा खूप उशीर झाला होता. नवऱ्याने तू असं का केलं म्हणून अनेकवेळा प्रश्न विचारला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

  9 महिने गर्भात वाढवलं आणि जन्मानंतर 2 दिवसांत आईनंच संपवलं, नेमकं काय प्रकरण

  या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सुनीता देवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शेरू आपल्या आजीसोबत बाहेर गेल्यानं त्याचा जीव वाचला. सुनीता देवाला माहेर-सासरच्या व्यक्तींनी या प्रकरणी दोषी ठरवलं.

  रस्त्यावर, टपरीवर चहा पित असाल तर सावधान! होऊ शकतो हा गंभीर आजार

  ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाजीपूर भागात घडली आहे. पैशांवरून बायकोसोबत वादावादी झाली. ज्यामुळे ती नाराज होती. तिला खर्चासाठी जास्त पैसे हवे होतो. जे देणं मला शक्य नव्हतं. माझ्या हातातील जवळपास सगळा पगार तिलाच खर्चासाठी देत होतो. असं असताना मी तिला जास्त पैसे देऊ शकत नाही यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वाद झाल्याचं पतीने सांगितलं. आरोपी महिला सुरुवातीपासून खूप वाद घालायची असं आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं. एकत्र कुटुंब असल्यामुळे ती कोणाशीच जुळवून घ्यायचा प्रयत्न करायची नाही. या घटनेनं कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Crime news, Tea, Uttar pradesh

  पुढील बातम्या