मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

स्कुटरवर मृतदेह घेऊन फिरत होता व्यक्ती; पाहा धक्कादायक CCTV VIDEO

स्कुटरवर मृतदेह घेऊन फिरत होता व्यक्ती; पाहा धक्कादायक CCTV VIDEO

Murder Video: हत्या (Murder) केल्यानंतर आरोपी मृतदेह (Dead body) स्कुटरवर (Scooter) घेऊन जाताना एका सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    दिल्ली, 30 डिसेंबर: दिल्लीतील रोहीणी परिसरातील प्रेमनगरमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्या मित्राचीच हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा आरोपी मित्राचा मृतदेह स्कुटरवर घेऊन जाताना एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी आरोपी मित्राच्या मुसक्या आवळल्या असून पुढील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाचं नाव रवि असून अंकीतने त्याची हत्या केली आहे. 77 हजार रुपयांच्या देवाण घेवाणीतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोपी अंकीतने आपला मित्र रविच्या डोक्यात जोरदार वार केला त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने योजना आखली. त्यानंतर त्यानं रविचा मृतदेह एका मोठ्या पोत्यात भरला आणि मृतदेह टाकून देण्यासाठी योग्य ठिकाण शोधू लागला. त्यासाठी मृतदेह स्कुटरवर टाकून त्यांनं जवळपास दोन किलोमीटर प्रवास केला. त्यानंतर त्यानं एका मोकळ्या जागेत मृतदेह पुरला आणि घटनास्थळावरून फरार झाला. पण ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले आहेत. हे वाचा-अत्यंत घृणास्पद! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून काढले फोटो, पुण्याजवळील घटना दुसरीकडे मृत रविच्या कुटुंबीयांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरू केला. पोलिसांनी तपास सुरू केला असता संबंधित सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत आरोपी अंकित स्कूटरवर पोत्यात काहीतरी घेऊन जाताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी अनेक एकामागून एक असे सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी अंकीत रविच्या मृतदेह त्या पोत्यात घेऊन जाताना दिसला. यानंतर त्याने हा मृतदेह रिकाम्या जागेत नेवून पुरला. मृत रविच्या कुटुंबियांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या