अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी
वाराणसी, 27 मे : धर्म आणि अध्यात्माची नगरी असलेल्या काशीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगेच्या काठावर आणि बाबा विश्वनाथ दरबारापासून हाकेच्या अंतरावर येथे आलेल्या भाविकांना डुकराचे मांस खुलेआम दिले जात आहे. याप्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर आता कारवाईही सुरू झाली आहे.
नेमकं काय घडलं -
तक्रारीनंतर दशाश्वमेध पोलीस ठाण्याचे पोलीस सुशी कॅफे नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. प्राथमिक तपासणीत रेस्टॉरंटच्या मेनूवर डुकराचे मांस डिशचे चित्रदेखील आढळले. दशाश्वमेधचे एसीपी अवधेश कुमार सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून दोन जणांना ताब्यात घेण्यासोबतच तेथे उपस्थित असलेला कच्चा माल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अन्न विभागाचे पथक आता या जप्त केलेल्या वस्तूंची चौकशी करेल, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
ऑनलाईन व्हायची डिलिव्हरी -
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दशाश्वमेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाथी फाटक परिसरात हे रेस्टॉरंट सुरू होते, जिथे लोकांना डुकराचे मांस दिले जात होते. पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या श्रीपती मिश्रा यांनी सांगितले की, गंगेच्या काठावर बाबा विश्वनाथ धामचे मंदिर जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये डुकराचे मांस दिले जात होते, त्यांना अशी माहिती मिळाली होती.
स्विगी आणि झोमॅटो व्यतिरिक्त, ऑनलाइनदेखील ते वितरित केले गेले. जे पूर्णपणे चुकीचे आहे. दुसरीकडे, या प्रकरणी अतिरिक्त सीपी संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीनंतर सर्वांवर कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.