Home /News /crime /

धक्कादायक! दत्तक मुलीने केलेल्या लग्नाच्या हट्टामुळे पित्याला गमवावा लागला जीव

धक्कादायक! दत्तक मुलीने केलेल्या लग्नाच्या हट्टामुळे पित्याला गमवावा लागला जीव

Delhi Crime: गर्लफेंडशी (Girlfriend) लग्न करू दिलं नाही म्हणून एका युवकाने गर्लफ्रेंडच्या वडीलांचा निर्दयी (Father Murder) खून केला आहे.

    नवी दिल्ली, 08 डिसेंबर : गर्लफ्रेंडसोबत लग्न करू न देणं हे एका पित्याच्या जीवावर उठलं आहे. गर्लफेंडशी लग्न करू दिलं नाही म्हणून एका युवकाने गर्लफ्रेंडच्या वडिलांचा निर्दयी खून केला आहे. त्याने स्वयंपाकघरातील चाकू आणि प्रेशर कुकरच्या साह्याने पित्याच्या डोक्यावर इतके वार केले, की ज्यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. ही घटना ईशान्य दिल्लीतील सोनिया विहार येथील आहे. दिल्लीतील सोनिया विहारमधील एका घरात पोलिसांना 50 वर्षीय बिजेंदर सिंग यांचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला.  मृतदेहाच्या डोक्यावर अनेक जखमा झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सूरज नावाच्या 25 वर्षीय मुलाने त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. सूरज हा पालम मेट्रो स्टेशनवर हाऊस कीपरचं काम करतो. शहा सभागृह येथून शहर सोडण्याच्या तयारीत असलेल्या सूरजला  पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. दत्तक घेतलं होतं मुलीला उत्तर पूर्व दिल्लीचे उपायुक्त वेद प्रकाश यांनी सांगितलं की, मुरादाबाद येथील बिजेंदर सिंग आणि त्याच्या पत्नीने एका मुलीला दत्तक घेतले होते. ही मुलगी आता 24 वर्षांची आहे. जिचे आरोपी सूरजसोबत अगदी जवळचे संबंध होते. हे या त्यांना आवडत नव्हतं. (हे वाचा-भिवंडी हादरली, 38 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार) सिंग यांनी आपल्या दत्तक मुलीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने सूरजपासून दूर जाण्यास नकार दिला. त्यानंतर सिंग आणि त्याच्या पत्नीने त्या मुलीला मुरादाबादमध्ये तिच्या खर्‍या आई वडिलांकडे नेलं होतं. मुलाच्या पालकांनी लग्नाची बोलणी केली होती उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, मुलगी जेव्हा मुरादाबादला गेली, तेव्हा सूरजच्या आई-वडिलांनी मुलीच्या कुटुंबियांसमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण बिजेंदर सिंग यांनी याला कडाडून विरोध केला. ज्याचा सूरजला खूप राग आला. त्यामुळे त्याने त्याने सिंगला मारण्याचा कट रचला आणि त्याने सिंगचा पाठलाग सुरू ठेवला. संधी मिळताच त्याने सिंगच्या घरी घुसून स्वयंपाकघरातील चाकूने त्याच्यावर वार केले. यानंतर, बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या सिंगच्या डोक्यात त्याने प्रेशर कुकरने अनेक वार केले. ज्यामध्ये सिंगचा जागीच मृत्यू झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news

    पुढील बातम्या