• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 15 दिवसांपूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओ अपघातात 3 मित्रांचा मृत्यू; एअरबॅग उघडून अक्षरश: फुटली

15 दिवसांपूर्वी घेतलेल्या स्कॉर्पिओ अपघातात 3 मित्रांचा मृत्यू; एअरबॅग उघडून अक्षरश: फुटली

हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 • Share this:
  राजनांदगाव, 7 ऑक्टोबर : राजनांदगाव ( Chhattisgarh News) जिल्ह्यातील गंडई चकनार मार्गावरील स्कॉर्पिओने (Scorpio Accident) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने कारमधील तीन मित्रांचा जागीच अंत झाला. स्कॉर्पिओ वेगात होती, त्यामुळे कंटेनरला धडक दिल्यानंतर एअरबॅग उघडून अक्षरश: फुटली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ कार 23 वर्षीय निखिल चालवित होता. मंगळवारी रात्री साधारण 10 वाजता गंडईपासून दोन किलोमीटर दूर चकनार येथे राहणारा निखिल आपल्या दोन मित्रांसह गंडईच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान रस्त्यात पेट्रोल पंप व विजेच्या ऑफिसजवळ रस्त्याच्या किनाऱ्याजवळील कंटेनरच्या मागच्या बाजूला स्कॉर्पिओ धडकली. धडक झाल्यानंतर फुटली एअरबॅग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ जलद गतीने येत होती. चालकाने रस्त्याच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओची एअरबॅग आपोआप उघडली आणि फुटली. आणि प्रवाशांचा मृत्यू झाला. हे ही वाचा-VIDEO :शाळेच्या खोलीत तरुणीसोबत शिक्षकाचा घृणास्पद प्रकार, गावकऱ्यांनी पकडलं तिघांचा जागेवर मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. तिघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तब्बल 15 दिवसांपूर्वी निखिलने सेकंड हॅन्ड स्कॉर्पिओ खरेदी केली होती. त्यानंतर दररोज तो गाडी खूप जलद गतीने चालवत होता. खरेदी केल्यानंतर स्कॉर्पिओची कायदपत्रदेखील निखिलच्या नावावर झाली नव्हती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: