Home /News /crime /

Shocking! तरुणीच्या मृतदेहासोबत लावलं लग्न; समोर आलं धक्कादायक कारण

Shocking! तरुणीच्या मृतदेहासोबत लावलं लग्न; समोर आलं धक्कादायक कारण

धक्कादायक बाब म्हणजे आधी तरुणीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला, त्यानंतर तिचं लग्न लावण्यात आलं.

    नायजेरिया, 5 सप्टेंबर : आफिकी देश नायजेरियातून एक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीला प्रेयसीच्या मृतदेहासोबत (Dead body) लग्न करावं लागलं. ज्या मुलीसोबत या व्यक्तीचं लग्न ठरलं होतं, तिचं अचानक निधन झालं. इतकचं नाही तर तरुणीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला, त्यानंतर तिच्या मृतदेहासोबत लग्न लावण्यात आलं. हे प्रकरण आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरलं आहे. लग्नानंतर पुन्हा मुलीचा मृतदेह दफन करण्यात आला. या मुलीचा प्रियकर पादरी असल्याचं सांगितलं जात आहे. (Marriage with a young womans dead body Shocking reason to come forward ) हे प्रकरण नायजेरियातील एका शहरातील आहे. 'डेली स्टार'मधील एका वृत्तानुसार, त्या व्यक्तीचं नाव डॉ. एमेका आहे. ही व्यक्ती पादरीदेखील आहे. एमेका पाच वर्षांपासून चिओमा नावाच्या मुलीला डेट करत होता. दोघांचं गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची प्रेयसी गर्भवती असल्याचे कळालं. यानंतर पादरीला धक्काच बसला. कित्येक दिवस पादरी याबाबत विचार करीत होता. लग्नापूर्वी (Marriage) या सर्व गोष्टी झाल्यामुळे त्याला धक्काच बसला होता. शेवटी एकेदिवशी त्याने कोणालाही न सांगता प्रेयसीला गर्भपाताचं औषध दिलं. प्रेयसीचा गर्भपात व्हावा यातून त्याने तिला औषध खाऊ घातलं. मात्र हा प्रकार त्यालाच महागात पडला. या औषधांतर प्रेयसीची तब्येत खूपच बिघडली. हे ही वाचा-चोरीसाठी विमानाने प्रवास, महागड्या हॉटेलात चैन; चौकशीदरम्यान पोलिसही हैराण धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला त्याने प्रेयसीला बोलावलं आणि तिला एक औषध दिलं. यावेळी त्याने गर्भपाताचे औषध असल्याचेही सांगितले नाही. औषध घेतल्यानंतर त्याची प्रेयसी बेशुद्ध पडली. आणि अचानक तिचा मृत्यू झाला. आता पादरीला नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. त्याने हे सर्व कोणाला सांगितलं नाही. प्रेयसीचं पोस्टमार्टम झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पादरीवर दबाव सुरू झाला. त्याच्या प्रेयसीच्या मैत्रिणीने हा सर्व प्रकार आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला. आणि हळूहळू हे प्रकरण तिच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचलं. शेवटी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी पादरीला तिच्या मृतदेहासोबत लग्न करण्यास सांगितलं. असं केल्यानंतरच त्याला माफ केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या सर्व प्रकारानंतर शेवटी पादरीला प्रेयसीच्या मृतदेहासोबत लग्न करावं लागलं. यासाठी आधी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला व यानंतर तिच्या मृतदेहासोबत त्याचं लग्न लावण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Pregnancy, Wedding

    पुढील बातम्या