मध्य प्रदेशच्या सीमेवर ठार झालेल्या माओवादी महिलेची धक्कादायक माहिती समोर

मध्य प्रदेशच्या सीमेवर ठार झालेल्या माओवादी महिलेची धक्कादायक माहिती समोर

दोन दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेली महिला माओवादी गडचिरोली जिल्हयातली रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

गडचिरोली, 13 डिसेंबर : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील बालाघाट जिल्ह्यात चकमकीत दोन महिला माओवादी (Maoist) ठार झाल्या होत्या. अखेर त्यातील एका महिलेची ओळख पटली असून तिच्यावर तब्बल 14 लाखांचे बक्षीस असल्याची बाबसमोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेली महिला माओवादी गडचिरोली जिल्हयातली रहिवासी असल्याचे समोर आले आहे. शोभा गावडे असं तिचं नाव आहे. शोभा ही गडचिरोली जिल्ह्याची रहिवासी असून मलाजखंड दलम  सदस्य होती.  तिच्यावर चौदा लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील बालाघाट जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन महिला माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असं सांभाळलं बॅलेन्स, पोलीसही झाले अवाक् LIVE VIDEO

शोभा गावडेवर खून, जाळपोळ पोलिसांवर हल्ला करणे असे 21 गुन्हे तीन राज्यातले दाखल आहेत. तिच्यावर 3 राज्याचे चौदा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तिच्यासोबत ठार झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

जहाल महिला माओवादी अटकेत, 6 लाखांचे होते बक्षीस

दरम्यान, जहाल महिला माओवादी  भामरागड एरीया कमिटीची सदस्य  असलेली पार्वती ऊर्फ सुशिला शंकर सडमेकला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. पार्वती सडमेक ही 2006 मध्ये माओवादी चळवळीत  भरती झाली होती. 2010 पर्यंत जहाल महिला माओवादी नर्मदाची अंगरक्षक म्हणून काम पाहत होती.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई,TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकटीव्हीच्या CEOला अटक

गडचिरोली पोलीस दलाने तिला अटक  केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तिला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पार्वती सडमेकवर  शासनाने 6 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात पार्वतीवर 24 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरीक्त तिचा आणखी किती गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या