Home /News /crime /

स्वत:च घर केलं उद्ध्वस्त; आधी पत्नी मग दोन्ही मुलांना गळा दाबून संपवलं, त्यानंतर मात्र...

स्वत:च घर केलं उद्ध्वस्त; आधी पत्नी मग दोन्ही मुलांना गळा दाबून संपवलं, त्यानंतर मात्र...

एकाच घरातील तिघांची हत्या झाली आणि हत्या करणारा घरातलाच व्यक्ती असल्याचं समजल्यानंतर, गावतील सर्वच जण हैराण आहेत. हत्येच्या आदल्या रात्री पती-पत्नीत काहीतरी कारणावरून वाद झाला. त्यादरम्यान पतीने पत्नीला मारहाण केली आणि त्याचवेळी गळा दाबून हत्या केली.

पुढे वाचा ...
    जुमई, 24 नोव्हेंबर : एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पत्नीला मारहाण केल्यानंतर, पत्नी आणि दोन मुलांची गळा दाबून हत्या केली. तिघांच्या हत्येनंतर आरोपीने याची माहिती स्वत: सर्वात आधी आपल्या बहिणीला दिली आणि त्यानंतर इतर नातेवाईकांना सांगितलं. बिहारमधील जुमई जिल्ह्यातील ही घटना आहे. आई आणि दोन मुलांच्या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. मंगळवारी सकाळी शेकडोच्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले होते. या तिघांची हत्या करणाऱ्याचं नाव प्रकाश यादव असल्याची माहिती आहे. तो सायकलचं पंक्चर काढण्याचं काम करुन आपलं घर चालवत होता. घरगुती वादातून त्याने तिघांची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. तिघांच्या हत्येनंतर आरोपी प्रकाश यादव फरार झाला होता. परंतु मंगळवारी सकाळी त्याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. (वाचा - प्रेम जिंकलं! व्हिलचेअरवर नवरदेव अन् त्याच्यामागे नवरी; असा पार पडला अनोखा विवाह) एकाच घरातील तिघांची हत्या झाली आणि हत्या करणारा घरातलाच व्यक्ती असल्याचं समजल्यानंतर, गावतील सर्वच जण हैराण आहेत. मृतांमध्ये आरोपीची 26 वर्षीय पत्नी, एक आठ वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. हत्येच्या आदल्या रात्री पती-पत्नीत काहीतरी कारणावरून वाद झाला. त्यादरम्यान पतीने पत्नीला मारहाण केली आणि त्याचवेळी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांनाही संपवलं. (वाचा - बियर पिणाऱ्या व्यक्तीने दिली तब्बल 2 लाखांची टीप, कारण ऐकून सगळे करताय कौतुक) आरोपीच्या पत्नीच्या नातेवाईकांनी याबाबत पोलिसांत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तिघांच्या हत्येनंतर आरोपी गावातील एका ठिकाणी लपला होता, मात्र ग्रामस्थांनी त्याला पकडलं. मृत महिलेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेहमी पत्नीला मारहाण करायचा. तो नेहमी सर्वांची हत्या करेन असंही बोलायचा. (वाचा - 'अरे क्या कर रहे हो', केस कापताना चिमुरड्याची न्हाव्यालाच धमकी,VIRAL VIDEO पाहाच) आरोपीने दुसरं लग्न करण्यासाठी पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचा आरोप, मृत महिलेच्या आईने केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या