छत्तीसगढ, 31 ऑक्टोबर : अशा बातम्यांमधून देशातील क्रुरता वाढत असल्याचे दिसते. अशीच अत्यंत धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बालोद जिल्यात घडली आगे. येथे एका कॉन्स्टेबलने दीड वर्षांच्या मुलीला अत्यंत वाईट वागणूक दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी त्या दीड वर्षांच्या मुलीला बाबा म्हणायला सांगत होता. यासाठी तो बाळावर जबरदस्ती करू लागला. बाळ बाबा म्हणत नसल्याचे पाहून त्याने मुलीला सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तो तेथून फरार झाला.
बालोद जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, पोलिसांनी काॅन्स्टेबल अविनाश राय याला अटक केलं आहे. त्याने लहान मुलीला सिगारेटचे चटके दिले व मुलीच्या आईला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राय विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि शनिवारी दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातील त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की दुष्कृत्य केल्यानंतर तो फरार झाला होता.
हे ही वाचा-खळबळजनक! एक हत्या लपवण्यासाठी दुसरी..तिसरी करीत 9 जणांची हत्या
राय काही वेळापूर्वी बालोद ठाण्यात काम करीत होता. दरम्यान तो सिवनी भागात एका महिलेच्या घरात राहत होता. पोलिसांनी सांगितले की महिलेचा पती नागपूरमध्ये राहतो. बालोदमध्ये असताना त्याने महिलेला कही पैसे कर्जाऊ दिले होते. आणि या दरम्याच्या 24 तारखेला राय आपले पैसे घेण्यासाठी महिलेच्या घरी गेला आणि तेथेच राहिला. महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री रायने मुलीली बाबा म्हणायला सांगितलं. मात्र जेव्हा मुलीनं असं केलं नाही तर त्याने सिगारेटने मुलीच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि हातावर अशा अनेक ठिकाणी सिगारेटचे चटके दिले, त्यानंतर महिलेलाही मारहाण केली व फरार झाला.