• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Love Story चा भयावह शेवट! प्रेमाचा प्रत्येक क्षण प्रेयसीसाठी ठरला मरणयातना, अखेर...

Love Story चा भयावह शेवट! प्रेमाचा प्रत्येक क्षण प्रेयसीसाठी ठरला मरणयातना, अखेर...

तरुणीने प्रियकराबाबत जे काही सांगितलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : एका तरुणीने आपल्या प्रियकराबाबत धक्कादायक (Shocking News) खुलासा केला आहे. तिने जे काही सांगितलं ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. तरुणीने सांगितलं की तिचा प्रियकर (Boyfriend) तिला रस्त्यावर भीक मागण्यासाठी दबाव आणत होता. इतकच नाही पुरेसे पैसे न आणल्यात तिला निघृणपणे मारहाण करीत होता. एकेदिवशी तर प्रियकराने तरुणीवर पेचकसने अनेक वार केला. मिरर युकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कॅनडाची 22 वर्षीय निकोलज क्लार्ज हिने आपल्या 21 वर्षीय प्रियकर काइल हेलम याच्याबद्दल हैराण करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. निकोलने सांगितलं की, काइल सुरुवातीपासून मारहाण करीत असे. त्याने तरुणीला मित्र आणि कुटुंबापासून वेगळं केलं.(Beating the Girlfriend) हे ही वाचा-नदी किनारी आढळला बेपत्ता तरुणीचा अर्धवट सांगाडा; हत्याकांडात धक्कादायक खुलासा हे दोघेजण एका हॉस्टेलमध्ये राहत होते आणि काही आठवड्यानंतर प्रियकर दुसऱ्या तरुणीला डेट करू लागला. एके दिवशी काइलने नशेत निकोलच्या चेहऱ्यावर मुक्का मारला. निकोलने विरोध केल्यावर त्याने माफी मागितली आणि गोष्ट टाळली. यानंतर तो तरुणीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिला गुलामांसारखी वागणूक देत होता. त्यानंतर निकोलने रुम बदलली. मात्र काइल दुसऱ्या ठिकाणीही तिच्या मागे मागे गेला. तो निकोलचा मोबाइल चेक करीत असे. तिला नेहमी मारहाण करीत होता. निकोलने सांगितलं की, ऑक्टोबर 2018 मध्ये काइल कोणा भिकाऱ्याशी भेटला आणि तिलाही भीक मागण्यासाठी जबरदस्ती करू लागला. घाबरून निकोल रस्त्यावर बसून भीक मागू (girlfriend beg) लागली. अनेक दिवस असं सुरू होतं. एक दिवस कमाई कमी झाली म्हणून काइल भडकला आणि पेचकसने तिच्या गुडघ्यात वार केले व तिला जखमी केलं. तो सर्व पैसे स्वत:च ठेवत होता आणि सर्व पैसे दारूत उडवीत होता. अखेर या प्रकरणात तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. आता तिचा नराधम प्रियकर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: