अहमदनगर, 30 नोव्हेंबर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जतेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तसे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
हेही वाचा - तरुणाच्या हत्येसाठी ऑर्डर केले तब्बल 25 चाकू; अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला पोलिसांचं निवेदन
गाडीला कट मारल्याचा कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime news