मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

माथेफिरूचं धक्कादायक कृत्य; सिरींजच्या साहाय्याने दुकानातील खाद्यपदार्थांमध्ये मिसळलं स्वत:चच रक्त

माथेफिरूचं धक्कादायक कृत्य; सिरींजच्या साहाय्याने दुकानातील खाद्यपदार्थांमध्ये मिसळलं स्वत:चच रक्त

या घटनेनंतर पोलिसांनी या दुकानातून खरेदी केलेले खाद्यपदार्थ फेकून देण्याचं आवाहन केलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी या दुकानातून खरेदी केलेले खाद्यपदार्थ फेकून देण्याचं आवाहन केलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी या दुकानातून खरेदी केलेले खाद्यपदार्थ फेकून देण्याचं आवाहन केलं आहे.

    लंडन, 27 ऑगस्ट : अनेकदा अशा बातम्या समोर येतात ज्या पाहून आपण हैराण होतो. नुकतच लंडनमधून (London) अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने असं कृत्य केलं आहे की, ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. या व्यक्तीने सिरिंजच्या (Syringe) मदतीने दुकानांत (Shops) ठेवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये (Food)  रक्त मिसळलं. ज्यामुळे खाद्यपदार्थ दूषित झालं आहे. (Contaminated Food). या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. (With the help of a syringe blood was mixed in the food in the shop) ही घटना वेस्ट लंडनमधील (West London) तीन दुकानांतील आहे. येथील दुकानदारांना संशय आहे की, एका माथेफिरू व्यक्तीने इंजेक्शनच्या मदतीने खाद्यपदार्थांमध्ये रक्त मिसळलं. बुधवारी पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने दुकानात ठेवलेल्या वस्तूंमध्ये आपलं रक्त मिसळल्याचा संशय आहे. त्याचा उद्देश लोकांना नुकसान पोहोचवण्याचा होता. दुकानदारांनी सांगितलं की, एका सिरिंजच्या मदतीने तो खाद्यपदार्थांमध्ये रक्त मिसळत होता. या घटनेनंतर भागातील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. हे ही वाचा-मुंबई हादरली! घरगुती उपचाराच्या नावाखाली 2महिने अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना तरी दुकानातील मांसाहार असलेले पॅक फूड फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्याशिवाय पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, जर त्यांनी या दुकानांमधून खाण्याच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्या फेकून द्याव्यात. दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती खाद्यपदार्थांमध्ये आपलं रक्त मिसळत होती. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपी अनेक नीडल घेऊन तीन सुपरमार्केटमध्ये गेला  होता. येथील प्रोसेस्ड फूड आणि पॅकेटमधील मांसाहारी पदार्थांमध्ये त्याचं रक्त असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या