Home /News /crime /

धक्कादायक! भररस्त्यात शिक्षकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने नाक व कानचं कापलं

धक्कादायक! भररस्त्यात शिक्षकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने नाक व कानचं कापलं

शाळेतून घरी जात असताना काही जमावाने शिक्षकाला अडवलं व त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

    गुजरात, 16 सप्टेंबर : राजस्थानमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बाडमेर भागात एका शाळेतील शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शाळेतून घराच्या दिशेने जाणाऱ्या या शिक्षकाला जमावाने घेरले व त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानातील बाडमेर येथे एका शाळेतील शिक्षकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतून घराच्या दिशेने जाणाऱ्या या शिक्षकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिक्षकाचे नाक व कान कापून टाकण्यात आले. बाड़मेर जिल्ह्यातील भटाला गावातील घटनेमागे प्रेम प्रकरणाचं कारण सांगितले जात आहे. या घटनेत शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. हे ही वाचा-भाजप मंत्र्याकडून राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान; सरकारी गाडीवर लावला उलटा तिरंगा मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकावर मुलीला पळवल्याचा आरोप आहे. बुधवारी या शिक्षकावर ज्या लोकांनी हल्ला केला ते पळवलेल्या तरुणीचे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीने भाऊ व काही नातेवाईकांनी मिळून शिक्षकाचं नाक व कान कापले. शिक्षकाला प्राथमिक उपचारासाठी त्याचे कुटुंबीय अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत. बाड़मेरच्या रागेश्वरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ही वाचा-भयंकर! वडील व भावाविरोधात सामूहिक बलात्काराची तक्रार; प्रियकरासाठी... रागेश्वरीचे पोलीस प्रमुख महेंद्र सीरवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्याकडून पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Z p school teachers

    पुढील बातम्या