धुळे, 24 डिसेंबर : येथील जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) तालुक्यात नवी अंतुर्ली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील 13 वर्षीय मुलाने सहा वर्षे (6 years old boy murder) मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने गावात खळबळ उडाली आहे. नवी अंतुर्ली गावातील मोहित दिनेश ईशी हा सहा वर्षाचा मुलगा आपल्या आईसोबत शेतात गेला होता.
आई शेतात काम करत असताना तो आपल्या तेरा वर्षांच्या मित्रासोबत खेळत होता. यादरम्यान या दोन्ही मित्रांमध्ये शुल्लक कारणावरुन भांडण सुरू झालं. या भांडणादरम्यान सुरुवातील त्याच्या एका मित्राने छोट्या दगडाने मारलं. यामुळे मोहितला जखम झाली व त्यातू रक्तश्राव होऊ लागला. मोहितला जखम झाल्याचे पाहून तो घाबरला आणि तो दुसऱ्या कोणाकडे तक्रार करेल या भीतीने त्याहून मोठा दगड त्याच्या डोक्यात घातला. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाबरलेल्या मुलाने मोहित कोणाकडे तक्रार करेल या भीतीने अजून मोठा दगड घातला आणि यातून त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुलांचे भावविश्व किती आक्रमक झाले आहे हे पुन्हा समोर आले आहे.
अनेकदा लहान मुलांना कशी वागणूक दिली जाते किंवा त्याच्यासमोर ज्या गोष्टी घडतात यावरुन त्यांचं भावविश्व फुलत जातं. यामुळे लहान मुलांना आक्रमक अशा व्हिडीओ गेम्सपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, टीव्ही, सोशल मीडिया याचा भयंकर परिणाम मुलांवर होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.