टोल मागितला म्हणून कथित शिवसेना कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, 4 कर्मचारी जखमी

टोल मागितला म्हणून कथित शिवसेना कार्यकर्त्यांनी केली तोडफोड, 4 कर्मचारी जखमी

टोल भरण्यावरून तरुणांचा राडा, रात्री केला टोल कर्मचाऱ्यांवर हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.

  • Share this:

भोपाल, 31 ऑक्टोबर: इंदौर इस्टेट हायवेवर असणाऱ्या टोल नाक्यावर टोल भरण्यावरून बुधवारी तरुणांची टोल कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. याचा राग मनात ठेवून या तरुणांनी बुधवारी रात्री टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे आणि टोलनाक्याची तोडफोड केली. या घटनेमध्ये 4 टोल कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हल्ला करणारे तरुण स्वत: ला शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत असं सांगत होते. टोल कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन कारमधून साधारण 15 ते 20 तरुणांची टोळी तिथे आली. त्यांनी टोलनाक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि त्यानंतर टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि कार घेऊन फरार झाले. या घटनेत4 टोल कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टोल न भरण्यावरून झाला वाद

बुधवारी सकाळी तरुण टोलनाक्यावरून जात असताना टोल भरण्यावरून जोरदार वाद झाला. आपण शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे टोल भरणार नाही असा धमकी वजा इशारा त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना दिला. दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि त्यावेळी नाइलाजाने टोल भरुन तरुण तिथून निघाले. मात्र हाच राग मनात ठेवून तरुणांनी रात्री टोलनाक्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करताच त्यांना मारहाण करण्यात आली. 15 ते 20 तरुणांनी मिळून टोल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्यानंतर ते कार घेऊन भोपाळच्या दिशेनं फरार झाले आहेत. ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या सीसीटीव्हीच्या आधारे टोल कर्मचाऱ्यांनी पोलिसात गुंडगिरी करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. कथित शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या या तरुणांनी अद्याप ओळख पटू शकली नाही तर सीसीटीव्हीच्या आधारे आणि गाडीवरील नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र हे खरंच शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का? आणि शिवसेनेचे कार्यकर्ते नसतील तर त्यांनी असं का सांगितलं?या सगळ्याचा तपासही सध्या सुरू आहे.

गाडीच्या सायलेंसरमागे म्हशींचं मॅरेथॉन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Oct 31, 2019 11:20 AM IST

ताज्या बातम्या