मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

VIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

'हिंमत असेल तर पोलीस बाजूला सारून समोर या', शिवसैनिकांचं संतोष बांगर यांना ओपन चॅलेंज

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर आज शिवसैनिकांनी हल्ला केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 25 सप्टेंबर : अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला झाल्याची बातमी ताजी असतानाच आज अमरावतीतदेखील तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं चित्र आहे. पण यावेळी शिवसैनिकांनी उदय सामंत नाही तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी बांगर यांची गाडी अडवत 50 खोक्के एकदम ओक्के अशी घोषणाबाजी केली.

शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटातसामिल होणारे आमदार होते.एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचेसोबत राहाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र अचानक दुसरे दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

संतोष बांगर आज दुपारी तीन वाजता अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजेच्या सुमारास आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.

(पीएफआयच्या त्या आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा, पुणे पोलिसांची मोठी कारवाई)

या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "काही नाही. मी, माझी पत्नी आणि बहीण गुरुजींचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मठाबाहेर निघाल्यानंतर चार-पाच तरुण गाडीजवळ आले. त्यांनी घोषणाबाजी केली आणि ते गाडीच्या मागे पळत होते. मी कुटुंबियांसोबत असल्याने त्यांनी मला गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर त्यांना बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आणि शिंदे साहेबांचा पठ्ठ्या कसा असतो, त्यांना खेदून-खेदून नाही मारलं असतं तर संतोष बांगर म्हणून पठ्ठ्याच स्वत:ला म्हणालो नसतो", अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली.

"ते दोन-चार लोकं होतं. त्यांनी घोषणाबाजी केली. माझी पत्नी आणि बहिणीने मला गाडीखाली उतरु दिलं नाही. नाहीतर मी त्यांना दाखवलं असतं. हल्ला झाल्यावर एक घाव आणि दोन तुकडे केले असते. त्यांच्यामध्ये एवढी धमक आहे तर हा संतोष बांगर त्यांना आव्हान देतो की मी त्या ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि त्यांच्यात किती धमक आहे ते पाहतो. मी हल्ला करणाऱ्यांना ओळखत नाही", असं संतोष बांगर म्हणाले.

First published: