शीतल आमटे यांच्या मृत्यूचे कारण लवकरच कळणार, 'या' रिपोर्टमधून होणार खुलासा

शीतल आमटे यांच्या मृत्यूचे कारण लवकरच कळणार, 'या' रिपोर्टमधून होणार खुलासा

डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 03 डिसेंबर : चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन (aanandvan) कुष्ठरोगी सेवा प्रकल्पाच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे (sheetal amte suicide case) मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा खुलासा हा रासायनिक पृथक्करण अहवालात (chemical analysis report) होणार आहे. त्यामुळे हा अहवाल कधी येतो, हे पुढील पोलीस तपासाची दिशा ठरवणार आहे.

शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तपासाची च्रक फिरवली आहे. आतापर्यंत पोलिसांनी डॉ. शितल यांच्याशी नजीकच्या काळात संवाद झालेल्या 90 टक्के लोकांशी चौकशी पूर्ण केली आहे. डॉ. शीतल यांचे निकटचे नोकर, घरगुती मदतनीस यांची चौकशी पुर्ण झाली आहे.

औरंगाबादेत तणाव! तरुणीवरून झालेल्या वादातून दोन गटात फ्री स्टाईल, VIDEO आला समोर

विशेष बाब म्हणजे, डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे. डॉ. शीतल यांनी या गॅजेटचे पासवर्ड नुकतेच बदलले होते व याची माहिती त्यांचे पती गौतम करजगी यांना देखील नव्हती.

सॉफ्टवेअर पासवर्ड लॉक असल्याने दिशा मिळणारा तपास खुंटला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही गॅजेटमध्ये डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे पासवर्ड ठेवला असल्याने प्रक्रिया अवघड झाली आहे. डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. त्यांनी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली असून याच स्थळी उलटी झालेले कापड देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; सुशील मोदींविरोधात इंजिनिअर उमेदवार

त्यांनी नेमके कोणते विष घेतले याबाबत पोस्टमोर्टमच्या रासायनिक अहवालात स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती असून हे विष त्यांनी कुठून मिळविले याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

आमटे कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता

शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसल्याने पोलीस आता आमटे कुटुंबीयांची चौकशी करण्याच्या बेतात असून त्यातून एखादा धागा शोधला जाणार आहे.  दुसरीकडे पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने आजही प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल जाहीर केलेला नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले शहीद जवानाच्या मुलीचे कन्यादान!

3 दिवसांच्या मौनानंतर आमटे कुटुंबाने कथित डॉ. शीतल यांचे सासू-सासरे असलेल्या करजगी दाम्पत्याने फेसबुकवर टाकून डिलिट केलेल्या प्रतिक्रियेवर पहिल्यांदाच आपलं मनोगत व्यक्त केले असून कौस्तुभ आमटे यांच्या पत्नी पल्लवी यांनी "हा काळ आमटे कुटुंबासाठी कठीण असून आम्ही सर्व शीतल यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध" असल्याचे म्हटले.

याशिवाय  सुहासिनी व शिरीष करजगी यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टला 'त्यांनी व्यक्त होणे 'अशी  प्रतिक्रिया दिली आहे.  आनंदवनवर समाजाने सतत विश्वास ठेवला आहे. तो कायम राखण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असेही पल्लवी आमटे म्हणाल्या.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 4:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या