मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Mumbai : महागड्या सायकलींवर होता चोराचा डोळा, एक चूक केली आणि.... Video

Mumbai : महागड्या सायकलींवर होता चोराचा डोळा, एक चूक केली आणि.... Video

धारावी परिसरातील शाहूनगर पोलिसांनी गस्त सुरू असताना पळणाऱ्या एका सराईत सायकल चोरास अटक केली आहे.

मुंबई, 21 सप्टेंबर : धारावी परिसरातील शाहूनगर पोलिसांनी गस्त सुरू असताना पळणाऱ्या एका सराईत सायकल चोरास नुकतीच अटक केली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना पाहून पळाल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करीत त्या तरुणाला पकडले. रईस तावर खान असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून विविध परिसरातून चोरी केलेल्या 27 सायकली जप्त करण्यात शाहूनगर पोलिसांना यश आले आहे. धारावीच्या शाहूनगर पोलिसांची परिसरातील संशयास्पद व्यक्ती त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी गस्त सुरु होती. त्यावेळी पोलिसांना पाहून या चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करीत त्याला पकडले. मात्र त्याच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणाहून ब्रँडेड कंपन्यांच्या सायकली चोरी करून शाहूनगर येथे सिटिझन बेकरी, एम्ब्रॉयडरी कारखाना, टेनरी कंम्पाउण्ड, शेठवाडी येथील आडोसा असलेल्या जागेत प्लास्टीकचा कपडा झाकून ठेवल्याचे पोलिसांना त्याने चौकशीत सांगितले.  हेही वाचा : LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अडीच लाख रुपये किंमतीच्या तब्बल 27 सायकली जप्त केल्या आहेत. त्याच्याविरोधात वांद्रे, खार, शिवाजी पार्क, डीबीमार्ग, विलेपार्ले, दादर पोलीस ठाण्यात जवळपास 10 गुन्हे दाखल आहेत.  याबाबत एसीपी दीपक वी.देशमुख म्हणाले, पोलिसांची परिसरातील संशयास्पद व्यक्ती त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी गस्त सुरु होती. त्यावेळी पोलिसांना पाहून या चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्याचा पाठलाग करीत त्याला पकडले. मात्र त्याच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं त्याला चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्याने एक नव्हे तर 27 सायकल चोरी केल्याचे समजले. शाहूनगर येथे सिटिझन बेकरी, एम्ब्रॉयडरी कारखाना, टेनरी कंम्पाउण्ड, शेठवाडी येथील आडोसा असलेल्या जागेत प्लास्टीकचा कपडा झाकून ठेवल्याचे समजले. त्यानंतर या सायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नागरिक सायकल चोरी गेली तर तक्रार करण्यासाठी येत नाहीत. मात्र आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करतो की ज्यांच्या सायकल चोरी झाल्या आहेत. त्यांनी कृपया शाहूनगर पोलीस ठाण्यात संपर्क करावा आणि सायकल घेऊन जाव्यात.
First published:

Tags: Crime, Mumbai

पुढील बातम्या