मुबंई, 06 डिसेंबर: मुबंईतील (Mumbai) 15 वर्षीय मुलाचा लैंगिक छळ (Sexual harassment) केल्याप्रकरणी 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुबंईतील गोरेगाव याठिकाणी घडली आहे. आरोपी महिला पीडित मुलाच्या घरी पेईंग गेस्ट (Paying guest) म्हणून राहत होती. पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अल्पवयीन मुलाशी मैत्री करुन अनेकदा त्याच्याशी लैंगिक चाळे (Sexual harassment) केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
भाडे न दिल्यामुळे खोटे आरोप
तक्रारदार महिलेने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा आरोपी महिलेच्या वकिलांनी केला आहे. फ्लॅटच्या भाड्याच्या पैशावरून वाद झाल्याने हे खोटे आरोप लावले असल्याचे आरोपी महिलेच्या वकिलांनी सांगितले.
पीडित मुलाच्या मित्रामुळे प्रकरण आले बाहेर
गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलाचे आणि आरोपी महिलेचे अनैतिक संबंध होते, अशी माहिती पीडित मुलाच्या मित्रांनी त्याच्या आईला दिली. यावरुन त्या पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी महिलेच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आरोपी महिला मुलाच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायची
आरोपी महिला एका शॉपिंग सेंटरमध्ये काम करते. तसेच ती एका मुलाची आईदेखील आहे. सप्टेंबर महिन्यापासून ही महिला येथे राहत होती. त्यानंतर तीन महिने ही महिला तिथे राहत होती. नोव्हेंबरच्या सुरुवातीला तिने फ्लॅट सोडला. या कालावधीत तिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.