ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

आरोपी रमेश सिंह (Ramesh singh) यानं एका महिलेचं तब्बल 21 वर्ष लैंगिक शोषण (sexual harassment) केलं आणि शेवटी मालमत्तेच्या हव्यासापोटी तिची निर्घृण हत्या (Murder) केली आहे.

  • Share this:

पीलीभीत, 18 डिसेंबर: एका चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. या व्यक्तीनं तब्बल 21 वर्ष या महिलेचं लैंगिक शोषण केलं आणि शेवटी मालमत्तेच्या हव्यासापोटी तिची निर्घृण हत्या केली आहे. तसेच तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर कब्जाही केला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या आईनं रमेश सिंह आणि आणखी एका साथीदाराविरुद्ध  पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींना लवकरचं अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

मृत महिलेच्या वृद्ध आईनं सांगितलं, की माझी मुलगी जेव्हा 21 वर्षांची होती तेव्हा ती एका स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्यावेळी तिचं महाविद्यालयातील रमेश सिंह नावाच्या एका क्लार्कशी प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी रमेश सिंहने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर तो तिला सातत्यानं ब्लॅकमेल करू लागला होता. यामुळं मृत महिलेचं आयुष्य खूपच खडतर झालं होतं.

आरोपी एवढ्यावरचं थाबंला नाही, तर त्यानं आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल मृत महिलेच्या पतीलाही सांगितलं. त्यामुळं त्यांचा घटस्फोटही झाला. या संधीचा फायदा घेत त्यानं अनेक वर्ष तिचं लैंगिक शोषण केलं. त्याचबरोबर मुलीच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर आरोपीचं घरी येणं-जाणं आणखी वाढलं. पण या मायलेकी काही करू शकल्या नाहीत. त्या हा सगळा प्रकार सहन करत राहिल्या. रमेश हा घरी येताना नेहमी त्याचा साथीदार चंद्रशेखर आणि दिलीप सिंह यांनाही घेऊन येत असायचा. 12 मार्च रोजी काही कामानिमित्त मी घराबाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेऊन या तिघांनी माझ्या मुलीची हत्या केली, असंही या वृद्ध मातेचं म्हणणं आहे.

सदर घटना उत्तरप्रदेशातील पीलीभीत येथील आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. या वृद्ध महिलेनं याबाबत पोलिसांकडे अनेकदा  तक्रारी केल्या होत्या पण त्याची योग्य दखल घेतली नाही. अखेर तिला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला, असं मृत महिलेच्या वृद्ध आईनं सांगितलं. सुनगढी पोलीस स्थानकाचे एसएचओ अतर सिंह यांनी सांगितलं की, या तिन्ही आरोपींच्या विरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 9:08 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading