कोल्लम, 3 जानेवारी : अलीकडच्या काळात अमानवीय कृत्य आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केरळमधील दक्षिण कोल्लममध्ये अशाच प्रकारची एक अमानवीय घटना उघडकीस आली आहे. गायींवर बलात्कार करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध गायींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
केरळमधील दक्षिण कोल्लम जिल्ह्यातील चंद्यामंगलम पोलिसांनी एका व्यक्तीला नुकतीच अटक केली आहे. हा गायींवर बलात्कार करायचा. यावेळी त्याला गुराख्यांनी पकडून दिले आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध गायींच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने नुकतेच एका शेतात असे अमानवीय कृत्य केले. या आरोपीचा क्रूरपणा समोर आल्यानंतर तो फरार झाला होता.
पेरेदम येथील रहिवासी असलेल्या मणी नावाच्या व्यक्तीवर प्राण्यांशी क्रूरतेने वागल्याचा आरोप होता. मणीने नुकताच एका गायीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना रविवारी (1 जानेवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. आरोपीने यापूर्वीही प्राण्यांसोबत असं वर्तन केलं आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. गेल्या वर्षी पशुपालक शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांशी अशाच पद्धतीने गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांतही अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत का, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
वाचा - पुण्यातलं कोयता प्रकरण ताजं असतानाचं आता लोणावळ्यात कोयत्याने मारहाण VIDEO
रविवारी पहाटे आरोपीने गायीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास शेतमजूर शेतातील गोठ्यात पोहोचले असता त्यांना जनावरांच्या हंबरण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज आला. त्यावेळी आरोपी गायीवर बलात्कार करत असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. मजुरांनी मणीला पकडण्याचा प्रयत्न केला; पण त्या पूर्वीच तो भिंतीवरून उडी मारून पसार झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. मणीने गायींचं लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. सध्या त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
दरम्यान केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील कान्हागड येथे मार्च 2022 मध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला होता. तिथे तीन व्यक्तींनी चार महिन्यांची गर्भवती असलेल्या बकरीवर बलात्कार केला होता. त्यानंतर या तिघांनी त्या बकरीला मारून टाकलं. होसदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बकरी कोटाचेरी येथील एलिट हॉटेलची होती. तिला एक महिन्यानंतर कोकरू होणार होतं. होसदुर्ग पोलिसांनी या प्रकरणी हॉटेलमधील एक कर्मचारी सेंथिल याला अटक केली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, सेंथिलसोबत असलेल्या दोन जणांचा शोध सुरू आहे. ``बुधवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांना हॉटेलच्या मागील बाजूस बकरी जोरात ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला. बकरी ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचताच तीन जण भिंतीवर उडी टाकून पळताना दिसले. मात्र यावेळी त्यांनी सेंथिलला पकडलं,`` असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.