महिला पोलिसाच्या मोबाइल नंबर पुढे लिहिलं 'सेक्स वर्कर'; मध्यरात्री फोन करुन विचारू लागले रेट

महिला पोलिसाच्या मोबाइल नंबर पुढे लिहिलं 'सेक्स वर्कर'; मध्यरात्री फोन करुन विचारू लागले रेट

लोक मध्यरात्री महिला पोलिसाला फोन करुन त्रास देत होते, अनेकांनी तर तिला रेटही विचारले

  • Share this:

चिकमंगळुरु, 24 डिसेंबर : कर्नाटकातील (Karnatak) चिकमंगळुरूमध्ये एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय या शिक्षकाने एका महिला कॉन्स्टेबलचं नाव आणि तिचा मोबाइल क्रमांक कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस स्टँडच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर लिहिला होता. त्यानंतर महिलेला मध्यरात्री अनेक फोन येऊ लागले. या फोनमुळे महिला इतकी त्रस्त झाली. याबाबत अधिक तपास केला असता धक्कादायक खुलासा झाला.

मध्यरात्री येत होते फोन, लोक अश्लील बोलायचे

महिला कॉन्स्टेबलने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा रात्री-अपरात्री लोकांचे फोन येऊ लागले त्यानंतर याबाबत खुलासा झाला. फोन करणारे लोक मध्यरात्री तिच्यासोबत सेक्स करण्याबाबत अश्लील गोष्टी बोलत. तिला घरी बोलावण्याचं रेट विचारू लागले. सुरुवातीच्या काही फोन कॉल्सकडे तिने लक्ष दिलं नाही. जेव्हा अशा कॉल्सचं प्रमाण वाढू लागलं, त्यानंतर तिला शंका आली.

एका कॉलरने सांगितलं की, शौचालयाच्या भिंतीवर होता नंबर

महिला कॉन्स्टेबलने एका कॉलरला विचारलं की, तुला हा नंबर कुठून मिळाला? तेव्हा त्याने सांगितलं की, हा नंबर कडूर बस स्टँडच्या पुरुषांच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर लिहिलेला होता. ती आपल्या पतीसोबत 15 डिसेंबर रोजी शौचालयात पोहोचली. तेथे भिंतीवर महिला कॉन्स्टेबलचा मोबाइल क्रमांक लिहिला होता. मोबाइल नंबर लिहिल्याबरोबर तिथे सेक्स वर्कर म्हटले होते. कॉन्स्टेबलला हस्ताक्षरावरुन ओळख पटली व तिला भूतकाळात घडलेली एक गोष्ट आठवली. यानुसार हे कृत्य सतीशने केल्याची शंका आली. सतीश तिच्यासोबत 2006-07 दरम्यान एका टीचर ट्रेनिंगदरम्यान सहकारी होता. 2017 मध्ये त्याच्या एका क्लासमेटने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये सतीशदेखील होता. सतीश या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह संदेश पाठवित असे. याशिवाय तो महिला कॉन्स्टेबलला फोन करुनही त्रास देत होता.

व्हॉट्सअॅप ग्रुपमधून वादाला सुरुवात

महिला कॉन्स्टेबलने सांगितलं की, जेव्हा त्याने सतीशकडे दुर्लक्ष करणं सुरू केलं, तेव्हा तिला व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन हटवलं. तिला कोणा दुसऱ्या सदस्याने पुन्हा ग्रुपमध्ये घेतलं. सतीशने तिला पुन्हा हटवलं. काही महिन्यांपूर्वी तिने सतीशला फोन केला, ज्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. सतीशने सूड घेण्यासाठी आणि तिची बदनामी करण्यासाठी शौचालयाच्या आतील भिंतीवर तिचा नंबर सेक्स वर्कर आहे म्हणून लिहिला.

Published by: Meenal Gangurde
First published: December 24, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या