कल्याण, 20 डिसेंबर : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र थर्टी फस्ट पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच कल्याणमध्ये (Kalyan) एका फ्लॅटमध्ये देहविक्रीचा (Sex racket) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका तरुणासह 4 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील एका घरात छापा टाकून देहविक्रीचा पर्दाफाश केला आहे.
हाजीमलंग रोडवर एका फ्लॅटमध्ये देहविक्री केली जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून फ्लॅटवर धाड टाकली.
गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, धर्मपरिवर्तनाचा खेळ!
यात पोलिसांनी मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन याच्यासह चार बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात जितू नामक आरोपी फरार असून त्याच शोध सुरू आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
डोंबिवलीत घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरी एकटी असल्याचे पाहून परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. पीडितेनं पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
लग्नाच्या 7 दिवसात नवविवाहितेने उचललं धक्कादायक पाऊल; परिसरात खळबळ
शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी माहिती दिली आहे. 'आरोपी महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारधार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीवर याआधीही चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.