राजस्थान, 12 ऑक्टोबर : राजस्थानमधील सवाईमाधोपूरमधून काही दिवसांपूर्वी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली होती. येथे काँग्रेस आणि भाजपच्या जिल्हा स्तरावरील महिला पदाधिकारी एकत्रितपणे देहविक्रयचा व्यवसाय चालवित असल्याची बाब समोर आले होते. त्यांच्यापैकी फरार झालेल्या व सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड असणारी काँग्रेस महिला नेता पूजा उर्फ पूनम चौधरी हिला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 20 दिवसांपासून ही महिला फरार झाली होती. राजस्थानमध्ये या सेक्स रॅकेटप्रकरणात ही आठवी अटक आहे. पूजावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा कट रचण्याचाही आरोप आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपने या महिलेला पक्षातून निलंबित केलं होतं. अख्ख्या देशभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप महिला मोर्चाची माजी जिल्हाध्यक्ष सुनीता वर्मा उर्फ संपती बाई हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर काँग्रेस सेवादलातील महिला माजी जिल्हाध्यक्ष पूजा उर्फ पूनम चौधरी फरार होती. त्यानंतर पोलीस तिच्या मागावर होते. आज तिलाही अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार दोन्ही महिला एकत्रितपणे हा गैरव्यवहार करीत होते. सांगितले जात आहे की, याच्या या गैरव्यवहारात अनेक तरुणी आणि महिला अडकल्या आहेत.
आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुनीताचा सोबती हिरालाल, कलेक्टर कार्यालयाचा शिपाई श्योराम मीना, जिल्हा उद्योग केंद्राचा लिपिक संदीप शर्मा आणि इलेक्ट्रिशयन राजूलाल रॅगर यांचा समावेश आहे. देशातील प्रमुख पक्षातील नेत्यांच्या या गैरव्यवहारामुळे मोठा गदारोळ झाला आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा-महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा समुळ नाश करणार’ CM योगींची गर्जना
एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही महिला एकत्रित काम करीत असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या शहरांमध्येही त्याचे कनेक्शन आहेत. दरम्यान यापैकी एका महिला नेत्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने दोन्ही दलांमध्ये अत्यंत घाणेरणे व चरित्रहीन लोक असून वेळ आल्यावर त्यांचा पदार्फाश करेल असे लिहिले आहे.