Home /News /crime /

नोकरीची लालूच देऊन तरुणींची विक्री, वेश्याव्यवसाय करण्यासाठी टाकला दबाव

नोकरीची लालूच देऊन तरुणींची विक्री, वेश्याव्यवसाय करण्यासाठी टाकला दबाव

नोकरीचं अमिष दाखवून दोन महिलांना पश्चिम बंगालवरून बिहारला आणण्यात आलं. मात्र सत्य परिस्थिती समजल्यावर त्यांना जबर धक्का बसला.

    कोलकाता, 31 डिसेंबर: नोकरीचं (Job) अमिष देऊन दुसऱ्या राज्यात (Another State) नेऊन तरुणींची विक्री (Human trafficking) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकील आला आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीचं अमिष दाखवून तरुणींना घरातून शहरात नेलं जायचं. तिथं तिची बोली लावून विकलं जायचं आणि त्यानंतर तरुणींना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं जायचं. मात्र दोन तरुणींनी यातून स्वतःची सुटका करून घेत हा गोरखधंदा समोर आणला आहे. असं चालायचं नेक्सस पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना बिहारमधील एका टोळीनं नोकरीचं अमिष दिलं होतं. यातील एक तरुणी आदिवासी असून ती अविवाहित आहे, तर दुसऱ्या तरुणीचं लग्न झालं होतं. या दोघींनाही बिहारमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं. आपली स्वप्नं पूर्ण होतील आणि चार पैसे मिळतील, या अपेक्षेनं दोघीही नोकरीसाठी तयार झाल्या आणि बिहारला गेल्या. मात्र तिथं त्यांची विक्री करण्यात आली आणि त्यांना एका अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलं. वेश्या व्यवसायासाठी आणला दबाव तरुणींनी परराज्यात विक्री करून त्यांना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं जायचं. या गोरखधंद्यातून दलालांना पैसे मिळत होते आणि त्यामुळे ते नवनव्या तरुणींना विकत घेऊ शकत होते. तरुणींनी या प्रकाराला विरोध केला आणि तिथून स्वतःची सुटका करून घेण्यात यश मिळवलं. अशी झाली सुटका या दोघी त्यांना ठेवलेल्या ठिकाणाहून पळाल्या आणि रेल्वेत बसून बिहारच्या चुचूडात पोहोचल्या. तिथल्या न्यायालयाच्या आवारात त्या संशयास्पदरित्या फिरत असताना दोन मानवाधिकार कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिलं आणि पोलिसांच्या मदतीने त्यांची विचारपूस केली. त्यावेळी सत्य परिस्थिती समोर आली. हे वाचा- WhatsApp ग्रुपवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पोस्ट केला अश्लील मसेज आणि मग... मोठं सेक्स रॅकेट पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये मोठं सेक्स रॅकेट कार्यरत असल्याचं या निमित्तानं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Police, Sex racket

    पुढील बातम्या