Home /News /crime /

धर्माच्या आड सुरू होतं Sex Racket; 'चिल्ड्रन होम'मध्ये नन करीत होती लहानग्यांच्या शरीराचा व्यापार

धर्माच्या आड सुरू होतं Sex Racket; 'चिल्ड्रन होम'मध्ये नन करीत होती लहानग्यांच्या शरीराचा व्यापार

त्यापैकी एका लहानग्यावर 10 वर्षात 1000 वेळा तरी बलात्कार करण्यात आला होता. यामध्ये पादरी, नेत्यांची नावे समोर आली आहेत.

    बर्लिन, 25 डिसेंबर : जर्मनीमध्ये (Germany) कॅथलिक ननकडून चालविल्या जाणाऱ्या ‘चिल्ड्रन होम’ चा भयंकर चेहरा समोर आला आहे. येथे राहणाऱ्या अनाथ मुलांना पादरी, राजनेते आणि व्यावसायिकांकडे सेक्ससाठी पाठवलं जात होतं. 'डेली मेल' मधील बातमीनुसार धर्माच्या आड चालणाऱ्या या सेक्ट रॅकेटचा खुलासा एका पीडितेने कोर्टाच दार ठोठावल्यानंतर झाला. कोर्टाने पीडित व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडित व्यक्तीने कोर्टात जे काही सांगितलं ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 5 वर्षांपासून सुरू आहे शोषण जर्मनीच्या कॅथोलिक नन (Catholic nuns) द्वारा संचालित ‘चिल्ड्रन होम’ विरोधात 63 वर्षीय व्यक्तीने Darmstaft Social Welfare Court चा दरवाजा ठोठावला होता. पीडित 1960 आणि 1970 दरम्यान ‘चिल्ड्रन होम’ मध्ये राहत होता. यादरम्यान त्याच्यासोबत 1,000 हून अधिक वेळा बलात्कार करण्यात आला. इतकच नाही तर अनाथालयात राहणाऱ्या अन्य मुलांनाही ननद्वारे पादरी (Priests) आणि नेत्यांसोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली होती. पीडितेने सांगितलं की, पाच वर्षांचा असताना त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. विरोध केल्यास केली जात होती मारहाण पीड़ितेची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मार्च 1963 मध्ये जर्मन शहर स्पेयरमधील ‘चिल्ड्रन होम’ मध्ये राहत होता. जे Order of the Sisters of the Divine Saviour द्वारा चालवलं जात आहे. ‘चिल्ड्रन होम’ मध्ये त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. ननद्वारा त्याला जबरदस्तीने पादरी आणि नेत्यांजवळ पाठवलं जात होतं आणि नकार दिल्यास त्याच्यासोबत मारहाण केली जात होती. कोर्टात पीडितेनं सांगितलं की, मुलांना बाहेर पाठवलं जात होतं आणि ‘चिल्ड्रन होम’ मध्येही तिच्यावर लैंगित अत्याचार केले जात होते. अनाथालयात एक खोली होती, तेथे पादरी, नेते आणि अन्य लोकांसमोर 7 ते 14 वर्षांच्या मुलांना पाठवलं जात होते. ते हवं तेव्हा मुलांवर बलात्कार करीत होते. त्यांचं ऐकणार तेथे कोणी नव्हतं. पीडितेने सांगितलं की, चिल्ड्रन होमची नन दलांलांप्रमाणे काम करत होती. जर कोणी तिचं ऐकण्यास नकार दिला तर त्यांना मारहाण केली जात होती. मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बदल्यात नन यांना पैसे मिळत होते. Nuns देखील करायच्या शोषण पीडितेच्या वक्तव्यानुसार चिल्ड्रन होमच्या नन्सदेखील मुलांचं लैंगिक शोषण करीत होते. वादात अडकल्यानंतर अनाथायाला 2000 मध्ये बंद करण्यात आलं, मात्र त्यानंतरही शोषणाच्या बातम्या समोर येत होत्या. तपासाअंती मिळालेल्या माहितीनुसार 1946 आणि 2014 दरम्यान तब्बल 1670 पादरींनी 3677 मुलांवर लैंगिक अत्याचार केला. पीडितेंनी सांगितलं की, नुकसानभरपाईमधील रक्कम त्यांचं गेलेलं जीवन पुन्हा आणू शकत नाही, जे चिल्ड्रन होममधील नन्समुळे उद्ध्वस्त झालं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या