Home /News /crime /

Virar Crime : विरारमध्ये नराधमांचा हैदोस, तरुणाला अमानुष मारहाण

Virar Crime : विरारमध्ये नराधमांचा हैदोस, तरुणाला अमानुष मारहाण

विरारमध्ये एका इसमाला रिक्षाचालकांच्या सात ते आठ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याचा धक्क्दायक प्रकार समोर आला आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : विरारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सात ते आठ जणांच्या जमावाने एका तरुणाला निर्दयी आणि प्रचंड अमानुषपणे मारहाण केल्याची धक्क्दायक घटना समोर आली आहे. विशष म्हणजे ज्या नराधमांनी पीडित तरुणाला मारहाण केली त्याच नराधमांनी या घटनेसंबंधित व्हिडीओ स्वत:च्या कॅमेऱ्यात शेअर करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलं आहे की नाही? आरोपी इतक्या निर्दयीपणे वागूणही इक्या निर्भयपणे कसे राहू शकतात? ते अशाप्रकारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर तरी कसे करु शकतात? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. नेमकं प्रकरण काय? विरारमध्ये एका इसमाला रिक्षाचालकांच्या सात ते आठ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याचा धक्क्दायक प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार हा रात्री उशिरा घडलाय. तरुणांनी लाकडी दांडके, लाथा-बुक्के आणि पट्ट्याचा वापर करुन त्या तरुणाला बेदम  मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या तरुणांनी हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करुन आपली दहशत माजविण्यासाठी इन्स्टाग्रामवर स्टेटसवर अपलोड केलं आहे. (राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना भयानक वाढतोय, आकडेवारी नेमकं काय सांगतेय?) फुलपाडा आणि गांधी चौक परिसरातील हे रिक्षाचालक तरुण असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या दहशतीने शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले पाहायला मिळत आहेत. दारु आणि अंमली पदार्थाच्या नशेत अनेक अल्पवयीन तरुणांच्या हाती रिक्षाचे हँडल आलेले आहे. त्यामुळे या प्रकारानंतर पोलिसांकडून त्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीडित तरुण जीवाच्या आकांताने किंचाळतोय संबंधित घटनेचे व्हिडीओ मारहाण करणाऱ्या नराधमांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. संबंधित व्हिडीओत पीडित तरुणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करण्यात आलेला आहे. त्यामुळे या घटनेचा व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाहीत. पण संबंधित व्हिडीओ बघितल्यानंतर बघणाऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात शिरेल. कारण या व्हिडीओत पीडित तरुणाला कशाप्रकारे मारहाण करण्यात येते ते स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पीडित तरुणांचा आक्रोशही त्या व्हिडीओत दिसतोय. संबंधित व्हिडीओ हा सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. त्यामुळे आता पोलीस यावर कारवाई करतात याकडे विरारच्या नागरिकांचं लक्ष आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या