मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मालकाच्या आजाराचा फायदा घेत चोरले 26 लाख, गर्लफ्रेंडसोबत करत होत ऐश आणि तेवढ्यात...

मालकाच्या आजाराचा फायदा घेत चोरले 26 लाख, गर्लफ्रेंडसोबत करत होत ऐश आणि तेवढ्यात...

 मालकाला कोरोना झाल्याचा गैरफायदा (Servant steel 26 lakh from owners house) घेत 26 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या नोकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • Published by:  desk news

रांची, 31 ऑगस्ट: मालकाला कोरोना झाल्याचा गैरफायदा (Servant steel 26 lakh from owners house) घेत 26 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या नोकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीनं (bought expensive things) आपल्याच मालकाचे 26 लाख रुपये चोरले आणि पोबारा केला. या पैशांनी (Police arrested thief) तो ऐश करत असतानाच पोलिसांनी त्याला पकडून गजाआड केलं.

अशी केली चोरी

झारखंडमधील रांचीमध्ये अनिल भगत नावाचा आरोपी नोकर म्हणून काम करत होता. घरात एकटाच राहणारा त्याचा मालक जेव्हा कोरोनाने आजारी पडला, तेव्हा अनिलच्या डोक्यात चोरीची कल्पना शिजली. घरात असणारे 26 लाख रुपये घेऊन त्याने पोबारा केला.

चोरीच्या पैशांनी केली ऐश

चोरीच्या पैशातून तो ऐशआरामाचं आयुष्य जगू लागला. रांचीवरून तो थेट छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये गेला आणि गर्लफ्रेंडसोबत राहू लागला. चोरीच्या पैशातून त्याने टीव्ही, लॅपटॉप, महागडे कपडे, सोफा आणि इतर फर्निचर घेतलं. गर्लफ्रेंडवर प्रभाव पाडण्यासाठी याच पैशातून अनेक महागडे गिफ्ट्स तिला आणून दिले.

गर्लफ्रेंडसोबत केलं देशभ्रमण

आरोपी अनिल चोरीच्या पैशांनी जवळपास पूर्ण देशभर फिरला. मुंबई, दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये दौरे करत तिथल्या अलिशान हॉटेलमध्ये त्याने मुक्काम ठोकले. पोलिसांना सुगावा लागू नये, यासाठी तो रांचीतून बाहेर पडून छत्तीसगडमध्ये राहत होता.

हे वाचा- Alert! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आढळलं Black Fungus

पोलिसांनी घेतली टेक्निकल टीमची मदत

26 लाख रुपये चोरून पोबारा केल्याच्या दिवसापासूनच पोलीस अनिलच्या शोधात होते. त्यासाठी पोलिसांनी टेक्निकल टीमची मदत घेतली. या टीमने शिताफीने तपास करत अनिलचं लोकेशन शोधून लागलं. पोलिसांनी रायपूरमध्ये धडक देत आरोपी अनिलला अटक केली. अनिलकडून पोलिसांनी 10 लाख रुपये रोख आणि इतर अऩेक महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास ट्रकभर सामान जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Chattisgarh, Corona, Crime, Theft