Home /News /crime /

कंगना रणौतच्या पर्सनल बॉडीगार्डवर गंभीर आरोप; मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल

कंगना रणौतच्या पर्सनल बॉडीगार्डवर गंभीर आरोप; मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल

Rape in Mumbai: कंगना रणौतचा बॉडीगार्ड (Kangana Ranaut Bodyguard) कुमार हेगडे याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार (Rape and Unnatural Act) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    मुंबई, 22 मे: बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा विविध वादही झाले आहेत. यामुळेचं तिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरनं बंदी घातली आहे. आता कंगनाचा बॉडीगार्ड अडचणीत सापडला आहे. कंगना रणौतचा बॉडीगार्ड (Kangana Ranaut Bodyguard) कुमार हेगडे याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार (Rape and Unnatural Act) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टनं (Rape on Make up artist) ही तक्रार दाखल केली आहे. आरोपी कुमार हेगडे हा गेल्या बऱ्याच वर्षांपासून कंगना रणौतचा पर्सनल बॉडीगार्ड म्हणून काम करतो. तर पीडित महिला मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान डीएन नगर मुंबई पोलिसांनी 19 रोजी रात्री उशीरा बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपी हेगडेनं 50 हजार रुपये घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कुमार हेगडे पीडितेला 2013 साली पहिल्यांदा भेटला होता. यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. तर गेल्यावर्षी जूनमध्ये आरोपी हेगडेनं पीडितेला प्रपोज केलं. तिनं होकार दिल्यानंतर हेगडे अधूनमधून पीडितेच्या घरी जाऊ लागला. दरम्यानच्या काळात त्यानं पीडितेसोबत बळजबरीनं लैंगिक संबंध ठेवले. शिवाय अनेकवेळा अनैसर्गिक पद्धतीनं जबरदस्ती केली. हे वाचा-स्वत:च्याच घरात अभिनेत्रीचा बलात्कार, आरोपीकडून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी एवढंच नव्हे तर, आरोपी हेगडे यानं 27 एप्रिल रोजी पीडितेच्या घरातून 50 हजार रूपये गुपचूप पळवल्याचंही तिनं तक्रारीत म्हटलं आहे. त्याचबरोबर आपल्या मुलाला लग्नासाठी जबरदस्ती करू नको, अशी धमकी आरोपीच्या आईनं केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kangana ranaut, Mumbai, Rape

    पुढील बातम्या