16 महिलांची हत्या करणारा Serial killer गजाआड; तुरुंगातून पळून करीत होता खून

16 महिलांची हत्या करणारा Serial killer गजाआड; तुरुंगातून पळून करीत होता खून

टास्क फोर्सच्या टीमने एका सीरियल किलरला ताब्यात घेतले आहे. ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना हा आरोपी लक्ष बनवित होता.

  • Share this:

हैद्राबाद, 26 जानेवारी : येथील टास्क फोर्सच्या टीमने एका सीरियल किलरला ताब्यात घेतले आहे. ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना हा आरोपी लक्ष बनवित होता. आरोपी एम रामल्लू याला दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला आतापर्यंत 21 वेळा अटक करण्यात आली असून यापैकी 16 या हत्येच्या केसेस त्याशिवाय चार प्रकरणात त्याच्यावर चोरीचा आरोप आहे. शिवाय एकदा तो तुरुंगातून पळूनही गेला होता. त्यातील एका प्रकरणात रामल्लूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर तो पॅरोलवर बाहेर होता.

45 वर्षीय रामल्लू बोराबंदा येथील मजुराचे काम करतो. त्याला नॉर्थ झोन टास्क फोर्सच्या टीमने 30 डिसेंबर 2020 रोज 50 वर्षीय वेंकटम यांच्या हत्येच्या आरोपाखाली आणि मुलुगूमधील बालंगूर येथे 10 डिसेंबर 2020 मध्ये एका अनोखळी महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हैद्राबाद पोलीस कमिश्नर अंजनी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सीरियल किलर रामल्लू हा ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांना लक्ष करीत होता. ताडीच्या दुकानात येणाऱ्या महिलांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्याकडील दागिने वा पैसे चोरी करीत होता.

हे ही वाचा-पिठाच्या गिरणीत केस अडकल्याचं निमित्त; महिलेचं शीर धडावेगळं होऊन झाला करुण अंत

रामल्लूने ताडीच्या दुकानात आलेल्या वेंकटम्मा यांना दारू विकत घेण्याचं सांगून एक निर्जन ठिकाणी घेऊन गेला व तेथे त्यांची हत्या केली. रामल्लूने दुसऱ्या एका महिलेचीसुद्धा अशाच प्रकारे हत्या केली होती. महिला दारूच्या नशेत असताना तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला व तेथे साडीने तिचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या चांदीच्या वस्तू पळवून पसार झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या केसमध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याच हैद्राबादमधील अनकुशापूर येथे हातात एक कागद आणि गळ्याभोवती साडीचा फास असलेला आणि अर्धवट जळलेला अनोळखी मृतदेह सापडला होता. त्यानंतर याचा शोध सुरू झाला. त्या महिलेच्या हातातील पेपरवर एक मोबाइल क्रमांक होता. त्याला फोन करुन यापुढील माहिती जमा करण्यात आली. मोबाइल क्रमांक असलेल्या व्यक्तीचा या हत्येशी काहीही संबंध नव्हता, मात्र याच्या मदतीने सीरियल किलरपर्यंत पोहोचता आल्याचं पोलीस कमिश्वरांनी सांगितलं. त्यानंतर हैद्राबाद टास्क फोर्सने सापळा रचून मंगळवारी आरोपीला अटक केलं आहे. या आरोपीने तब्बल 16 महिलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 26, 2021, 7:55 PM IST

ताज्या बातम्या