Home /News /crime /

मीच होणार हेडमास्तर! शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच दोन शिक्षकांमध्ये जुंपली, एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवले

मीच होणार हेडमास्तर! शिक्षणाधिकाऱ्यांसमोरच दोन शिक्षकांमध्ये जुंपली, एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवले

आपल्यालाच मुख्याध्यापक करा, या मागणीसाठी दोन शिक्षक अधिकाऱ्यांसमोर (Senior teacher fight with each other for post of head master) एकमेकांशी भिडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

    पटना, 14 ऑक्टोबर :  आपल्यालाच मुख्याध्यापक करा, या मागणीसाठी दोन शिक्षक अधिकाऱ्यांसमोर (Senior teacher fight with each other for post of head master) एकमेकांशी भिडल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आपल्याला मुख्याध्यापक होण्याची इच्छा असून (Fight in front of education officer) आपणच त्यासाठी सर्वात पात्र उमेदवार आहोत, असा या दोघांचाही दावा होता. या दाव्यातून वाद पेटला आणि प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. अशी झाली सुरवात बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात एका शाळेत कनिष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक करण्यात आल्याचं प्रकरण गाजत होतं. याची माहिती घेऊन खातरजमा करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी शाळेत आले होते. त्यावेळी दोन वरीष्ठ शिक्षक त्यांना भेटले आणि आपणच कसे मुख्याध्यापक होण्यासाठी पात्र आहोत, हे पटवून द्यायला त्यांनी सुरुवात केली. एकाने एक दावा केला आणि लगेच दुसरा शिक्षक दुसरा दावा करत असे. अधिकारी झाले हतबल आपल्यासमोर हमरीतुमरीवर येत असलेल्या या शिक्षकांकडे पाहून काय करावं, ते अधिकाऱ्यांनाही सुचेना. ते दोघांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते. पण आपली बाजू कमी पडायला नको, म्हणून दोघेही जोर लावून स्वतःला अधिक पात्र असल्याचं सिद्ध करत होते. असं करता करता त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. स्वतःचं कौतुक करता करता ते एकमेकांवर टीका करू लागले. थोड्याच वेळात टीकेची जागा शिव्यांनी घेतली आणि शिक्षकांनी एकमेकांची कॉलर पकडली. हे वाचा -दोन वर्षांच्या बाळानं घेतला आईचा जीव, एका चुकीमुळे वडिलांना झाली अटक सर्वांसमोर हाणामारी शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांदेखत या दोन शिक्षकांमध्ये जोरदार जुंपली. एकमेकांची कॉलर पकडून त्यांनी खेचले. एकमेकांच्या कानशिलात लगावल्या आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवून काढले. हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनीही तिथं गर्दी केली होती. इतर शिक्षकांनी पुढाकार घेत दोघांना वेगळं केलं आणि प्रकरण थंड केलं. हा प्रकार पाहून धक्का बसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी काहीही न बोलता तिथून काढता पाय घेतला. या प्रकाराची गावात जोरदार चर्चा रंगली होती. पदासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना काय धडे देणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत होते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bihar, Crime, Teacher

    पुढील बातम्या