इंदूर, 22 फेब्रुवारी : ‘सॉरी आई मी बिघडलो आहे, मला माफ कर', मला घरी यावस वाटत नाही, आणि कुठे जावसही वाटत नाही. मला घरातील परिस्थिती पाहवत नाही. जाऊ तर कुठे जाऊ....हे वाक्य तरुणाने आपल्या सुसाइड (Suicide) नोटमध्ये लिहिलं आहे. त्याने आपल्या आईसाठी ही चिठ्ठी लिहिली.
घरातील आर्थिक स्थितीमुळे त्रस्त झालेल्या तरुणाला ऑनलाइन सट्ट्याचं व्यसन लागलं आणि सर्व गमावून बसला. ऑनलाइन गेमच्या (Online Game) व्यसनामुळे इंदूरमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. कर्ज आणि वसुलीमुळे त्रस्त झालेल्या तरुणाने सुसाइड केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने दोन पानी सुसाइड नोट लिहिली.
आर्थिक अडचणीमुळे ऑनलाइन जुगाराची सवय...
जितेंद्र वास्कले नावाचा हा विद्यार्थी खरगोन येथे राहणारा होता. इंदूरमध्ये भंवरकुआ भागात भाड्याने घेर घेऊन अभ्यास करीत होता. ती बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होता. सोबतच सिक्युरिटी गार्डची नोकरी करीत होता. त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. खूप पैसे कमावण्याच्या ईर्षेने तो ऑनलाइन जुगार खेळू लागला. जुगार खेळण्यासाठी तो ऑनलाइन कंपनीकडून लोन घेतलं होतं. मात्र जुगारात तो सर्व पैसे हरला. कर्ज फेडण्यासाठी कंपनीला त्याला सतत फोन करू लागली. यामुळे त्रस्त होऊन तरुणाने आत्महत्या केली. त्याने बहिणीला फोनवर सॉरी मेसेज लिहून माफी मागितली. बहीण त्याला कारण विचारत होती, मात्र जितेंद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने सुसाइड नोटवर आईचं नाव लिहिलं आहे.
हे ही वाचा-नाईट ड्यूटी संपवून खोलीवर येताच नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, सॉरी आई, मी बिघडलोय. मला माफ कर, मला घरी येण्याची इच्छा नाही. मला घरातील परिस्थिती पाहावत नाही. मी कुठे जाऊ?
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.