मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

WhatsApp स्टेटसवरून झालेल्या वादाचा 2 वर्षांनी घेतला बदला; पुण्यात शाळकरी मुलावर कोयत्याने वार

WhatsApp स्टेटसवरून झालेल्या वादाचा 2 वर्षांनी घेतला बदला; पुण्यात शाळकरी मुलावर कोयत्याने वार

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

लग्नाला अवघे काही तास बाकी असताना नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबतचे अनैतिक संबंध उघडकीस आल्याने नवरदेवाची पंचाईत झाली.

Crime in Pune: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्यावरून शाळेच्या ग्रुपमध्ये झालेल्या वादातून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. आरोपींनी दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा बदला आता घेतला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 28 मार्च: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्यावरून शाळेच्या ग्रुपमध्ये झालेल्या वादातून (Dispute over whatsapp status) तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार (attack with scythe) केले आहेत. आरोपींनी दोन वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा राग आता काढला आहे. या हल्ल्यात फिर्यादी तरुण जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर उपचार केले जात आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक (2 Accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

तन्मय निम्हण आणि करण मोरे (दोघेही वय -19) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. हे दोघंही पुण्यातील पाषाण परिसरातील रहिवासी आहेत. याबाबत आदित्य दशरथ औचरे (वय- 18, बालेवाडी) यानं फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य आणि आरोपी हे एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्याच्या कारणातून शाळेतील ग्रुपमध्ये त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटलं देखील होतं. पण त्यांच्यात दुष्मणी कायम होती.

हेही वाचा- अशुद्ध भाषेत दिली खऱ्या प्रेमाची साक्ष; फरशीवर 'आय लव्ह यू वैशाली' लिहून तरुणानं संपवलं जीवन

दरम्यान घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री आदित्य आपल्या दोन मित्रांसोबत पाषाण परिसरात आला होता. यावेळी आरोपी तन्मय आणि करण यांच्यासह अन्य एका आरोपीनं आदित्यला अडवलं. तसेच तुम्ही पाषाणला का आला आहात? असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान, शिवीगाळ करू नको असं आदित्य तिघांना म्हणाला. यावेळी संतापलेल्या आरोपींनी रागाच्या भरात आदित्यच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला.

हेही वाचा-वास्तूशांतीनंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूनं ठोठावलं दार;नवीन घराचं स्वप्न हवेत विरलं

यावेळी आदित्यसोबत असणारे त्याचे मित्र नूर हुसेन सय्यद आणि अमन बागवान यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच जास्त बोलला तर जिवे मारेल, अशी धमकीही दिली. यानंतर घाबरलेल्या नूर आणि अमन यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर आरोपींनी तावडीत सापडलेल्या आदित्यला मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निम्हण तालीम मंदिराच्या मागील बाजूस घडला आहे. यानंतर आदित्यनं चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Pune