पोलिसांना पाहताच स्कूटी मागे फिरवली; पकडल्यानंतर सर्वांनाच बसला धक्का!

पोलिसांना पाहताच स्कूटी मागे फिरवली; पकडल्यानंतर सर्वांनाच बसला धक्का!

पोलीस आता तपास करणार, हे कळताच त्यांनी तातडीने स्कूटी मागे फिरवली. मात्र तेवढ्यात..

  • Share this:

छत्तीसगड, 4 मे : छत्तीसगडमधील गरियाबंदमधील पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी तस्कऱ्यांकडून तब्बल 50 लाख रुपयांचे 440 नग हिरे जप्त केले आहेत. सांगितलं जात आहे की, तस्कर स्कूटीवरुन हे हिरे फिंगेश्वरच्या रस्त्याने रायपूर येथे घेऊन जात होते.

या रस्त्यावर पोलिसांनी तस्कऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही घाबरले. आणि मागच्या मागे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. जेव्हा याचा तपास करण्यात आला तेव्हा पोलीसही हैराण झाले. एकत्रितपणे 440 नग हिरे संपूर्ण छत्तीसगडमध्ये यापूर्वी कधीच सापडले नाहीत.

हे ही वाचा-Lockdown लागताच कोल्हापूरकरांनी राजकीय मंडळांचा Whatsapp वरुन घेतला समाचार

यापूर्वी गरियाबंद जिल्हा पोलिसांनी गेल्या दीड वर्षात 7 विविध ठिकाणांहून 672 नग हिरे तस्कऱ्यांकडून जप्त केले होते. सर्व मिळून याचं मूल्य दीड कोटी इतके झाले असून 1100 नग हिरे पकडविण्यात पोलिसांना यश आलं आहे. या जिल्ह्यातील मैनपूर भागातील पायलीखंड नावाची हिऱ्याची खाण आहे. येथून अवैध खोदकाम केलं जातं. सांगितलं जात आहे की, अवैध्य खोदकाम करणाऱ्यांकडून कमी किमतीत हिरे खरेदी केले जाते. त्यानंतर मोठ्या शहरांमध्ये विकले जाते. मात्र यंदा मोठ्या प्रमाणात हिरे सापडले आहेत. त्यानुसार या प्रकरणात बड्या व्यक्तीचा समावेश असल्याची शक्यता आहे. पोलिसांनी दोन तस्कऱ्यांना अटक केली असून त्यांचे कॉल डिटेल्सचा शोध घेतला जात आहे.

सध्या देशभरात कोरोना कहर आहे. त्यामुळे पोलिसांकडून अधिक काळजी घेतली जात आहे. त्यात गुन्हेगारीच्या घटनाही वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 4, 2021, 8:14 PM IST

ताज्या बातम्या