राख वेचत असताना सापडली कात्री, गर्भवती महिलेचा ऑपरेशननंतर झाला होता मृत्यू

राख वेचत असताना सापडली कात्री, गर्भवती महिलेचा ऑपरेशननंतर झाला होता मृत्यू

घरी गेल्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेची प्रकृती अचानक ढासळली. त्यानंतर पुन्हा तिला मोगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

  • Share this:

पंजाब, 12 नोव्हेंबर : पंजाबमधील (Punjab) मोगा (Moga) इथं शासकीय रुग्णालयामध्ये (government hospital)डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर (delivery) महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे,  जेव्हा या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा एक कात्रीच सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील मोगा शहरात ही घटना घडली आहे. मृत महिला ही बुध सिंह वाला या गावात राहत होती. तीन दिवसांपूर्वी तिला मोगाच्या एका सरकारी रुग्णालयात प्रसूती वेदना आल्यामुळे दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

घरी गेल्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेची प्रकृती अचानक ढासळली. त्यानंतर पुन्हा तिला मोगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती नाजूक असल्यामुळे फरीदकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

धक्कादायक! नर्स पेशाला काळीमा, 8 मुलांचा जीव घेतला अन् 10 जणांच्या हत्येचा डाव

महिलेचा मृतदेह हा तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी धार्मिक परंपरेनुसार अंत्यविधी केला. जेव्हा अस्थी गोळा करण्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक पोहोचले होते तेव्हा राखेत त्यांना एक कात्री आणि ऑपरेशन करण्यासाठी वापरणारे काही अवजारांचे अंश आढळून आले. त्यामुळे कुटुंबीयांना रुग्णालयावर संशय बळावला. त्यांनी मोगा रुग्णालयावर आरोप केला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

परंतु, मोगा सरकारी रुग्णालयाने या कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले. 6 नोव्हेंबरला ही महिला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होता. होता. त्यामुळे तिला फरीदकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबीयांना जी कात्री सापडली आहे, ती शासकीय रुग्णालयात वापरत नाही, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मोगा सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली.

हातगाडी..पाणीपुरी-शेवपुरी आणि 'त्या' तिघी, धडपड पाहून राज ठाकरेही भारावले

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबांने पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांना सापडलेली कात्री आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या आहे.  पोलिसांनी याबद्दल रुग्णालय प्रशासनाला एक पत्र पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: November 12, 2020, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या