• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • भयंकर! रेल्वे ट्रॅकवर विद्यार्थ्याचा करुण मृत्यू, शाळेची फी भरता न आल्याने होता अस्वस्थ

भयंकर! रेल्वे ट्रॅकवर विद्यार्थ्याचा करुण मृत्यू, शाळेची फी भरता न आल्याने होता अस्वस्थ

शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या (School student died on railway track) एका विद्यार्थ्याचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  चंदिगढ, 6 ऑक्टोबर : शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या (School student died on railway track) एका विद्यार्थ्याचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या मित्रासोबत शाळेत जाण्यासाठी निघालेल्या (Went on railway track instead of school) या विद्यार्थ्याने काही काम असल्याचं सांगत वेगळी वाट पकडली. तो रेल्वे ट्रॅककडे गेला आणि दोन तुकडे झालेला त्याचा (Villagers found dead body) मृतदेहच ग्रामस्थांना सापडला. या घटनेनं सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. शाळेला जाताना बदलला मार्ग हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात सौरभ नावाचा विद्यार्थी दहावीत शिकत होता. प्रभाकर नावाच्या आपल्या मित्रासोबत तो सकाळी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडला. गेल्या काही दिवसांपासून तो शाळेत न जाता इतरत्र जाण्याचा बहाणा करत असे. मात्र त्याचा मित्र प्रभाकर त्याला समजावून शाळेत नेत असे. घटनेच्या दिवशी मात्र काही तातडीचं काम असल्याचं सांगत सौरभने दुसरीकडे जाणार असल्याची माहिती प्रभाकरला दिली. प्रभाकर शाळेकडे गेला आणि सौरभ रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेला. रेल्वे ट्रॅकवर मृत्यू शताब्दी एक्सप्रेसखाली येऊन सौरभचा मृत्यू झाल्याची घटना समजल्यावर कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला. सौरभच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते. सौरभने आत्महत्या केली  की हा अपघात होता, याबाबत अद्याप कुठलीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. मात्र सौरभच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्याच्या मार्गात रेल्वे ट्रॅक येत नसल्यामुळे मुळात सौरभ तिकडे का गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे वाचा - क्रूझ ड्रग्ज पार्टीच्या कारवाईत नवा ट्विस्ट, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट फी भरली नसल्याचे नाराज कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात आर्थिक गणित बिघडल्यामुळे सौरभच्या वडिलांना त्याच्या शाळेची फी भरायला जमत नव्हती. शाळेत गेल्यावर शिक्षकांकडून होणारी विचारणा आणि घरची गरीबी यामुळे सौरभ अस्वस्थ असल्याचं त्याचे मित्र सांगतात. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
  Published by:desk news
  First published: