Home /News /crime /

मुलांना विश्वासात घ्या! चंद्रपुरमध्ये शाळकरी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, Shocking कारण समोर

मुलांना विश्वासात घ्या! चंद्रपुरमध्ये शाळकरी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, Shocking कारण समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेत दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा खोटा बनाव रचला. विशेष बाब म्हणजे हा बनाव रचण्याची कल्पना त्याला टीव्ही शोमधून सुचली.

    चंद्रपूर 04 ऑगस्ट : आजकाल लहान मुलांमध्ये टीव्ही आणि मोबाईलवरील शो पाहाण्याचं प्रमाण जास्तच वाढलं आहे. याचे काही फायदे असले तरी अनेक तोटेही आहेत. लहान वयातच घराबाहेर खेळण्याच्या आणि मस्ती करण्याच्या वयात मुलं गुन्हेगारी आणि इतर विचित्र आशयाच्या घटना पाहतात आणि अनेकदा याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक घटना आता चंद्रपूरमधून समोर आली आहे. औरंगाबादमध्ये हॉटेलच्या रुममध्ये प्रेमीयुगुल आढळलं धक्कादायक अवस्थेत! 29 जुलैपासून होतं वास्तव्य या घटनेत दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा खोटा बनाव रचला. विशेष बाब म्हणजे हा बनाव रचण्याची कल्पना त्याला टीव्ही शोमधून सुचली. टीव्हीवरचे क्राईम शो पाहून या मुलाने स्वतःच्या अपहरणाची कथा तयार केली. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा हा बनाव पोलिसांनाही लवकर समजला नाही. पोलिसांनी सर्व महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, तरीही काहीच सुगावा लागला नाही. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथे घडलेल्या या घटनेने पोलीस आणि पालक सगळेच बुचकळ्यात पडले. मुलाचं अपहरण नक्की कोणी आणि का केलं होतं? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, अखेर पोलिसांनी या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्याकडूनच याबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी चौकशीत मुलाने जो खुलासा केला, तो सर्वांनाच हादरवणारा होता. विरारमध्ये रात्रीच्या अंधारात बापानेच 3 वर्षाच्या मुलाला खड्ड्यात पुरलं; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह या मुलाने आपण स्वतःच अपहरणाचा बनाव रचला असल्याचं पोलिसांसमोर मान्य केलं. इतकंच नाही तर हा बनाव रचण्यामागचं कारण आणखीच थक्क करणारं होतं. हा मुलगा घरून शाळेत जाण्यासाठी निघाला मात्र तो शाळेत गेलाच नाही. अशात शाळेत गैरहजर राहिल्याने पालक रागवतील म्हणून त्याने हा सगळा बनाव रचला होता. चंद्रपुरातील या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Kidnapping

    पुढील बातम्या