50 पैशांसाठी SBI ने ग्राहकाला बजावली नोटिस, कोर्टात पोहोचले प्रकरण

50 पैशांसाठी SBI ने ग्राहकाला बजावली नोटिस, कोर्टात पोहोचले प्रकरण

मद्यसम्राट विजय माल्ल्या आणि हीरा व्यापारी निरव मोदीने देशातील विविध बॅंकांना कोट्यवधी रुपयांना चूना लावला आहे.

  • Share this:

जयपूर,15 डिसेंबर: मद्यसम्राट विजय माल्ल्या आणि हीरा व्यापारी निरव मोदीने देशातील विविध बॅंकांना कोट्यवधी रुपयांना चूना लावला आहे. एवढेच नाही दोघांना विदेशात पलायन केले आहे. सरकारी यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसली आहे. दुसरीकडे, एक आश्चर्य व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. ती म्हणजे, राजस्थानातील झुंझुनूं येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या (एसबीआय) एका शाखेने आपल्या एका ग्राहकाला केवळ 50 पैशांसाठी नोटिस बजावली आहे. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.

काय आहे प्रकरण?

खेतडी येथील लोकन्यायलयात शनिवारी हे प्रकरण समोर आले. 50 पैशांसाठी ग्राहकाला बॅंकेने बजावलेली नोटिस पाहून न्यायाधिशही थक्क झाले. जितेंद्र कुमार असे नोटिस बजावण्यात आलेल्या ग्राहकाचे नाव आहे. जितेंद्र कुमार यांनी एसबीआयच्या शाखेत जनधन खाते उघडले आहे. या खात्यात 124 रुपये जमा आहेत. तरी देखील बॅंकेने 12 डिसेंबरला रात्री 11 वाजता जितेंद्र यांच्या घरी एक नोटिस पाठवली. जितेंद्र कुमार यांच्याकडे 50 पैसे थकबाकी असून त्यांनी ती त्वरीत भरावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसद्वारे देण्यात आला आहे.

काय लिहिले आहे नोटिसमध्ये...

जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, खेतडी येथे शनिवारी लोकन्यायालय आहे. तिथे हजर होऊन थकबाकी असलेले 50 पैसे जमा करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, ग्राहक जितेंद्र यांच्या ऐवजी त्यांचे वडील विनोद सिंह खेतडी येथील लोकन्यायालयात पोहोचले. जितेंद्र यांच्या मणक्यांचा त्रास असल्याने ते येऊ शकले नाही, असे त्यांनी लोकन्यायालयात सांगितले.

विनोद सिंह यांनी सांगितले की, केवळ 50 पैशांसाठी बॅंकेने मुलाला नोटिस बजावली आहे. एवढेच नाही तर बॅंकेचे अधिकाऱ्यांनी तगादा लावला आहे. आता बॅंकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याप्रमाणे अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे जितेंद्र यांचे वकील विक्रम सिंह यांनी सांगितले आहे. हे ऐकून लोकन्यायालयात उपस्थित असलेले बॅंक अधिकाऱ्यांने मात्र काढता पाय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 07:10 PM IST

ताज्या बातम्या