चौकार की षटकार? उत्तर देणं पादचाऱ्याला पडलं महागात; 2 भावांनी केली बेदम मारहाण

चौकार की षटकार? उत्तर देणं पादचाऱ्याला पडलं महागात; 2 भावांनी केली बेदम मारहाण

Crime in Nashik: स्त्यावरून पायी चालत जात असताना क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणं एका युवकाला चांगलचं महागात पडलं आहे. दोन भावंडांनी एका पादचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.

  • Share this:

नाशिक, 18 मे: रस्त्यावरून पायी चालत जात असताना क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणं एका युवकाला चांगलचं महागात पडलं आहे. मारलेला चेंडू हा चौकार असल्याचं सांगितल्यानं राग आलेल्या दोन भावंडांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पीडित युवकानं सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालही अटक करण्यात आली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

संबंधित घटना शरणपूर रोडवरील एका शाळेजवळ सोमवारी घडली आहे. जॉर्ज साळवे असं मारहाण झालेल्या पीडित युवकाचं नाव असून तो शरणपूर रोड येथील रहिवासी आहे. फिर्यादी साळवे सोमवारी शरणपूर रोडवरील रचना हायस्कूल जवळील मैदानापासून कामानिमित्त कुठेतरी जात होती. दरम्यान या मैदानात काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी आरोपी दीपक कुऱ्हाडे फलदाजी करत होता. ज्यावेळी फिर्यादी साळवे मैदानापासून जात होता, त्याच वेळी आरोपी दीपक कुऱ्हाडेनं चेंडूला एक जोराचा फटका मारला.

यावेळी हा चेंडू थेट फिर्यादी साळवे यांच्या दिशेनं गेला. पण मारलेला चेंडू हा चौकार होता की षटकार याबाबत अन्य खेळाडू आणि आरोपींमध्ये संभ्रम निर्माण झाला. यावेळी गोलंदाजी करणाऱ्या तरुणानं साळवे यांना 'चौकार आहे की षटकार?' असं विचारलं. यानंतर फिर्यादी साळवे यांनी हा चौकार असल्याचं सांगितलं. त्यामुळे राग आल्याले दोघा भावांनी साळवे यांना बेदम मारहाण केली. दरम्यान क्रिकेट खेळणाऱ्या अन्य तरुणांनी मध्यस्थी करत भांडणं सोडवली.

हे ही वाचा-VIDEO: मुंबईत टोल नाका लुटण्याचा प्रयत्न; माजी कर्मचाऱ्यानेच आखला होता प्लॅन

त्यानंतर पीडित साळवे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जाऊन दोघां भावांविरोधात गुन्हा दाखल केला. दीपक कुऱ्हाडे आणि प्रणव असं मारहाण करणाऱ्या दोन आरोपी युवकांची नावं आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

Published by: News18 Desk
First published: May 18, 2021, 12:16 PM IST

ताज्या बातम्या