खऱ्या 'देवमाणूस' खुनी डॉक्टराच्या कृत्याबद्दल धक्कादायक खुलासा, साक्षीदाराने कोर्टात दिली माहिती

खऱ्या 'देवमाणूस' खुनी डॉक्टराच्या कृत्याबद्दल धक्कादायक खुलासा, साक्षीदाराने कोर्टात दिली माहिती

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणाची गेल्या 4 वर्षांपासून सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

  • Share this:

सातारा, 20 डिसेंबर : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या वाई हत्याकांड प्रकरणी (satara wai doctor case) धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी डॉ. संतोष पोळने माझ्या समोर मंगला जेधे, सलमा शेख आणि भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. त्यांनतर नराधम संतोष पोळने (Santosh Pol) आनंद व्यक्त केला असल्याची साक्ष माफीची साक्षीदार ज्योती मांढरेने सातारा जिल्हा न्यायालयातील सुनावणी वेळी दिली आहे.

महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या  वाई हत्याकांड प्रकरणाची गेल्या 4 वर्षांपासून सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान साक्षीदार ज्योती मांढरेने धक्कादायक माहिती दिली आहे.

माथेफिरुपणाचा कळस! परदेशी रेडिओ ऐकला म्हणून किम जोंगच्या अधिकाऱ्यांनी केली हत्या

संतोष पोळच्या संपर्कात येण्याअगोदर त्याने 3 खून केले होते तर यातील बरेचसे खून पैशाच्या आणि सोन्याच्या हव्यासापोटी केले असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ज्योती मांढरेची साक्ष घेतली आणि त्यांनतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणी केली. न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने आता पुढील सुनावणी 2 जानेवारीला होणार आहे.

गौहर खान आणि झैद दरबारचं हटके डिजिटल वेडिंग कार्ड; VIDEO मधून उलगडली लव्हस्टोरी

सुनावणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांचा कॅमेरा दिसताच केलेल्या क्रुरकृत्याबद्दल आपल्याला कसलाच पश्चाताप नसल्याचं दाखवत संतोष पोळ चेहऱ्यावर सैतानी हसू आणत गाडीत जाऊन बसला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

2016 मध्ये  सातारा जिल्ह्यातल्या वाईतल्या बोगस डॉक्टर संतोष पोळनं सहा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मंगल जेधे या महिलेच्या बेपत्ता प्रकरणाच्या चौकशीतून संतोष पोळनं केलेल्या सहा खुनांना वाचा फुटली. संतोष पोळने गेल्या 13 वर्षांत केलेल्या सहा हत्यांची कबुलीच पोलिसांसमोर दिली. संतोष पोळनं सुरेखा चिकणे, वनिता गायकवाड, जगाबाई पोळ, नथमल भंडारी आणि सलमा शेख यांचाही खून केला होता. त्याच्या हॉस्पिटल आणि घराच्या परिसरातून मृतदेह सापडून आले होते.

Published by: sachin Salve
First published: December 20, 2020, 9:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या