'खबऱ्या'कडून पोलिसांना टिप मिळाली आणि वर्षभरापूर्वीच्या खुनाचा उलगडा झाला

'खबऱ्या'कडून पोलिसांना टिप मिळाली आणि वर्षभरापूर्वीच्या खुनाचा उलगडा झाला

या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांंनी एक खास पथकही तयार केलं होतं. मात्र त्यांना यश येत नव्हतं शेवटी पोलिसांना खबऱ्यांच्या नेवर्कचा फायदा झाला.

  • Share this:

अमोल मोहिते, सातारा 19 डिसेंबर : सातार्‍यात मागच्या वर्षी डिसेंबर 2018मध्ये एका महिलेची राहत्या घरात अज्ञात इसमाने निर्घृण हत्या केली होती. त्यावरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तब्बल एक वर्षानंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात सातारा पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी संशयित आरोपीस पुण्यातून अटक केलीय. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांनी माहिती दिली. त्या माहितीचा माग काढत पोलिसांनी तपास पुढे नेला आणि त्यातून त्यांना वर्षभरापूर्वीच्या एका खूनाचा उलगडा झाला. सातारा शहराजवळ असणाऱ्या हामदाबाज येथे 29 डिसेंबर 2018 मध्ये मीना आनंदराव देसाई या महिलेचा राहत्या घरात हत्या झाली होती. मीना यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या आणि चेहऱ्याला टेप लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ला

या प्रकरणात संशयित आरोपीने कोणताही पुरावा घरात सोडला नसल्यामुळे पोलिसांसमोर या खुनाचं रहस्य उलगडण्याचं मोठं आव्हान उभं राहिले होतं. तब्बल एक वर्षानंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणात संशयित सतार नन्नू शेख या व्यक्तीवर पाळत ठेवून त्याला पुण्यातुन पोलिसांनी ताब्यात घेतलं.

शेखकडे पोलिसांनी चौकशी केली असता पहिले त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवताच घराच्या बांधकाम केलेल्या पैशाच्या देवाण घेवाणीतून हत्या केल्याचं कबूल केलं. गुन्ह्यामध्ये कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी गुन्ह्याला एक वर्ष झाले असताना चिकाटीने ह्या गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल पोलीस पथकाचं कौतुक करण्यात येतंय.

प्रेमीयुगुलाने गळफास लावून केली आत्महत्या, महिला विवाहित तर तरुण अविवाहित

गेली वर्षभर पोलीस अनेक मार्गाने हा गुन्हा उकलण्याचा प्रयत्न करत होती मात्र त्यांना यश येत नव्हतं. या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांंनी एक खास पथकही तयार केलं होतं. मात्र त्यांना यश येत नव्हतं शेवटी पोलिसांना खबऱ्यांच्या नेवर्कचा फायदा झाला.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 05:02 PM IST

ताज्या बातम्या