मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यातील धक्कादायक प्रकार, मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिले प्रोत्साहन

पुण्यातील धक्कादायक प्रकार, मृत्यू दाखला द्यायला सरपंचाने मागितली लाच, ग्रामसेवकानेही दिले प्रोत्साहन

लाच मागणीस लोकसेवकानेही प्रोत्साहन दिले.

लाच मागणीस लोकसेवकानेही प्रोत्साहन दिले.

लाच मागणीस लोकसेवकानेही प्रोत्साहन दिले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 1 ऑक्टोबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच लाचखोरीच्या घटनाही समोर येत आहेत. एका सरपंचाने मृत्यूदाखला देण्यासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सरपंचाने 8 हजार रुपयांच्या रकमेची लाच मागितली. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

अनिल बाळू येवले (33, सरपंच, कुसरगाव खुर्द, ता. मावळ, जि. पुणे) व अमोल बाळासाहेब थोरात (34, ग्रामसेवक कुसगाव खुर्द ग्रामपंचायत, ता. मावळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. चुलत आजी-आजोबा यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळण्याकरिता आणि चुलत आजोबांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी केलेले मागणी अर्ज व हरकती अर्ज यांच्या प्रती मिळण्यासाठी लाच मागण्यात आली होती.

ही घटना कुसगाव खुर्द येथे घडली. येथील सरपंचाने तक्रारदाराकडून 8 हजार रुपयांच्या रकमेची लाच स्वीकारली. तसेच त्यांनी केलेल्या लाच मागणीस लोकसेवकानेही प्रोत्साहन दिले. त्यामुळे याप्रकरणी सरपंचासह ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

याप्रकरणी 26 सप्टेंबरला एका 33 वर्षीय तरुणाने ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांच्याकडे दाखले मिळण्याकरिता अर्ज केला होता. मात्र, सरपंचांनी दाखले देण्याकरिता लाचेची मागणी केली, अशी तक्रार तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याने केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच येवले यांनी दाखले देण्याकरिता 10 हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा - प्रेमात झाला धोका, तरुण रेल्वेवर चढला आणि हायहोल्टेज तारेला पकडलं, पुण्यातला VIDEO

यानंतर तडजोआडीअंती 8 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. विशेष म्हणजे लाचेच्या मागणीला ग्रामसेवकानेही प्रोत्साहन दिले. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक या करीत आहेत.

First published:

Tags: Pune, Pune crime news